बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:01:03+5:30

आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हेतूने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे ही योजना अंमलात आणली. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

Launch of fertilizer-seed scheme on the dam | बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ

बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देदिघोरी येथे आयोजन : लाखांदूर तालुका कृषी विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुका कृषी विभागाच्या वतीने दिघोरी (मोठी) येथे बांधावर खते-बियाणे योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव कापसे, सरपंच अरुण गभने, तालुका कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महादेव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे, कृषी सहायक काकडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड म्हणाले, कोरोना विषाणूशी संपुर्ण देश लढा देत आहे आणि या लढ्याला जीवंत ठेवण्याचे काम शेतकरी करीत आहे. अख्या जगाची भूक मिटविण्यासाठी शेतकरी प्रतिकुल परिस्थितीत अन्न पिकवित असतो. आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हेतूने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे ही योजना अंमलात आणली. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. गटाच्या माध्यमातून रासायनिक खते, बि-बियाणे खरेदी केल्याने कृषी केंद्रात गर्दी होणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होईल. गटाच्या माध्यमातून एकावेळेस जास्त निविष्ठा खरेदी केल्या जात असल्याने भाव वाजवी मिळेल. यावेळी शेतकरी ललीराम खंडाईत, रवी करंजेकार, बाबुराव देशमुख, सुरेश कढाणे, मुखरु कापसे, मुखरु सेलोकर, यशवंत हटवार उपस्थित होते.

Web Title: Launch of fertilizer-seed scheme on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती