शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी, पवनी परिसरात चोरी

By admin | Updated: February 23, 2017 00:23 IST

आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली.

नागरिक भयभीत : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढलाखनी : आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली.आदर्शनगर येथील संजय महादेव उके रा.लाखनी यांच्या घरी समोरील दाराला कुलूप लागलेला पाहून अज्ञात चोरानी २१ व २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचांदीचे दागीने व नगदी पैसे असे मिळून १ लाख पाच हजार रुपयांची धाडसी चोरी केली. याच परिसरात मागीलवर्षी एका घरी भरदिवसा चोरी झाली होती. लाखनी परिसरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे. लाखनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)पवनी : मागील काही दिवसापासून पवनी परिसरात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून आतापर्यंत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली असून दोन प्रकरणात पोलीसात तक्रार केल्या असून एका प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली नाही.पवनी लगत असलेल्या शेषनगर येथील रहिवासी सुखदेव नरूले हे घटनेच्या रात्री खरबी येथे नातेवाईकाकडे गेले असता घरी चोरट्यांनी घराचा मुख्य लाकडी दरवाजा फोडून घरातील सोनी कंपनीचे एलसीडी २९ हजार रूपये, सोन्याचे डोरले ६०००, नगदी २००० रूपये असा ३७००० रूपयांचा ऐवज चोरुन नेला. घरातील सामानाची फेकाफेक केली. पोलिसांचा श्वान पथक गुन्हेगारापर्यंत पोहचू नये, यासाठी दुचाकीमधील पेट्रोल मुख्य गेटजवळ शिंपळून ठेवले होते. त्यामुळे श्वान पथक तिथेच फिरत होते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार मधुकर गिते, उपनिरिक्षक सचिन गदादे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)