शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगफिशर’ संघ विजेता

By admin | Updated: February 12, 2016 01:22 IST

चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या घटकेला भंडाऱ्याच्या तरूणाई संघावर मात करीत गोंदियाच्या किंगफिशर संघाने आपले नाव नगराध्यक्ष चषकावर कोरले.

नगराध्यक्ष चषक : भंडाऱ्यात तरूणाईचा जल्लोषभंडारा : चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या घटकेला भंडाऱ्याच्या तरूणाई संघावर मात करीत गोंदियाच्या किंगफिशर संघाने आपले नाव नगराध्यक्ष चषकावर कोरले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाने वर्चस्व सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. त्यात किंगफिशर संघ यशस्वी झाला. अनेक वर्षांनंतर भंडाऱ्यात अशाप्रकारचे क्रिकेटचे सामने भंडाराकरांना बघावयास मिळाले.नगर परिषद भंडारा व तरूणाई सेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रेल्वे ग्राऊंड, येथे करण्यात आले होते. विदर्भातील संघासह छत्तीसगड, मध्यप्रदेशचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात तरूणाई सेवा फाऊंडेशन भंडारा व किंगफिशर क्रिकेट संघ दाखल झाले. अंतिम सामन्यात किंगफिशर संघाने ९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र किंगफिशरच्या गोलंदाजीपुढे फलंदाज तग धरू न शकल्याने शेवटच्या षटकात १८ धावांनी पराभव करून किंगफिशर संघाने चषक पटकावले. सामन्यानंतर विजेत्या किंगफिशर संघाला नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष चषक व ५१ हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सरिता फुंडे, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, तरूणाईचे अध्यक्ष महेंद्र निंबार्ते, सुनिल मेंढे, नरेंद्र गुर्जर, राम वझलवार, नगरसेवक जुगल भोंगाडे, माणिक गायधने, मकसूद बन्सी, शमीम शेख, राजू साठवणे, धनराज साठवणे, संध्या धनकर, कविता भोंगाडे, रूपेश टांगले उपस्थित होते. तरूणाई संघाच्यावतीने द्वितीय पारितोषिक संघाचे कर्णधार अन्वेष मेंढे व चमूला चषक व ३१ हजार रूपयांचे बक्षीस तर तृतीय बक्षीस ११ हजार रूपयांचे तरूणाईच्या संघाला देण्यात आले.अंतिम सामन्याचे सामनावीर विजय, स्पर्धेचे मालिकावीर भंडाऱ्याचा उमेश काकडे, उत्कृष्ट फलंदाज प्रतिक, उत्कृष्ट गोलंदाज अभीजित, एका सामन्यात भंडाऱ्याच्या आकांत सलामे या खेळाडूने ३५ चेंडूत ११७ रन झळकावले त्याला ३,१०० रूपयाचे तर तरूणाईच्या अमित गोन्नाडे याने एका सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार मारल्यामुळे १,००० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून उत्कृष्ट कार्य पार पाडल्याबद्दल प्रदीप शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. सामालोचनाचे कार्य निखिल यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. (प्रतिनिधी)