शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मारेकऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: November 6, 2014 22:51 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित कुटूंबातील जाधव परिवाराच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मागणी : डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदनसाकोली : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित कुटूंबातील जाधव परिवाराच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोलीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी साकोली मार्फत निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच साकोली येथे या हत्याकांडाचा तीव्र निषेधही करण्यात आला आहे.या निवेदनानुसार भाजपचे नवे सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा गावातील दलित कुटूंब संजय जाधव (४३) त्याची पत्नी जयश्री (४४) व मुलगा सुनिल (१९) यांची दि.२१ आॅक्टोबरला अमानुष व कार्यपद्धतीने हत्या करण्यात आली. घटनेला एवढे दिवस लोटूनही पोलीस आरोपीचा शोध घेण्यास असमर्थ ठरली आहे.सत्तारूढ विद्यमान सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय घटनेच्या तत्व निदर्शनानुसार धर्म, वर्ग, जात, लिंगाच्या आधारावर भेदभाव न करता सर्व धर्म समभाव तत्वावर शासन चालविण्याची हमी देत असले तरी दलितावर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. तालुक्यातील जनता अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा तीव्र निषेध नोंदवित आहे. डॉ. आंंबेडकर स्मारक समिती साकोली मार्फत निषेध निवेदन सादर करीत आहे. या दलित हत्याकांडाची त्वरीत चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची न्यायीक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे, असे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना अध्यक्ष घनशाम राऊत, उपाध्यक्ष अ‍ॅड. वामनराव खोब्रागडे, सचिव प्रभाकर बडोले, बी.एन. रामटेके, बी.बी. राऊत, शिलादेवी वासनिक, कल्पना सांगोडे, डी.जी. रंगारी, धीरज वाहने, अमित राऊत, चोपराम राऊत, सोनू राऊत, धरमदास नंदेश्वर, नामदेव गजभिये, मालती राऊत, मीना शामकुंवर, मनोज कोटांगले, नितीन मेश्राम, बाबुराव धारगावे, अचल मेश्राम, डॉ. नरेश राऊत, देविका गणवीर, अंजिरा नंदागवळी, भोला भालेकर, शैलेश रंगारी, नितीन राऊत, प्रविन कोटांगले, महेंद्र बडोले, विश्वास राऊत, शामराव हुमणे, अनुसया खांडेकर, दमयंता नंदेश्वर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)