शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना लाभ देणे तुमची जबाबदारी, प्रामाणिकपणे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे  यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळावा म्हणून कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सकारात्मक कारवाई करावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनातील विभागांचे आहे. अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करून योजनेचा लाभ मिळवून द्यावा. प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावे, असे खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले आहे.भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे  यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळावा म्हणून कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सकारात्मक कारवाई करावी. तसेच पीक विमा कंपनीचा एक कर्मचारी कृषी कार्यालयात नेहमी ठेवण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी, अशी सूचनाही केली. मुद्रा लोन घेताना अनेक होतकरू तरुणांना अडचणी येत आहेत. यासाठी असलेल्या अटी शिथिल करून नवउद्योजकांना प्रेरणा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. एका सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या रेती चोरीवर निर्बंध घालण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रेती घाटाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम मिळावे यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना देताना खासदारांनी राज्यात चांगले काम करण्यासाठी रोहयोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. वैयक्तिक लाभाच्या गुरांच्या गोठ्यांचे नियोजन प्रत्येक पंचायत समिती स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्वांना घरे योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आवास प्लस, राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना याअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, असेही खासदार यांनी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह सीईओ विनय मून, सदस्य विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, महेंद्र शेंडे, प्रकाश करंजेकर, डॉ. शांताराम चाफले, भोजराम कापगते, विलास डहारे, माधुरी नखाते, सेलोकर, बिसन सयाम, प्रकाश कुर्झेकर, हिरालाल वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी