शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासन मदतीत शेतकरी व छोट्या दुकानदारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST

संचारबंदी काळात शासन अंत्योदय लाभार्थ्यांना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मोफत देणार आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना ...

संचारबंदी काळात शासन अंत्योदय लाभार्थ्यांना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मोफत देणार आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, नोंदणीकृत बांधकाम मजूर, फेरीवाले, रिक्षावाले यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांना यातून थोडीथोडकी मदत होणार आहे, पण देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला व शेतमजूर आणि ग्रामीण भागातील लहान छोटे व्यावसायिक ज्यांची हातावर आणून पानावर खाण्याची स्थिती आहे, त्यांचा शासनाने कोणताही विचार न केल्याने शेतकरी व ग्रामीण जनतेची शासनाप्रती नाराजी असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ व देशाचा कणा समजला जाणारा शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करतो आहे. त्यातच मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका बसला असून आजघडीला शेतकरी खचला असला तरी हिमतीने अजूनही परिस्थितीशी लढतोच आहे.

त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने शेताची मशागत करणे मोठी तारेवरची कसरत आहे. कारण मशागतीचे भाव जरी वाढले असले तरी मालाचे भाव १५ वर्षापूर्वी होते तेच आहेत. आता शासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला, त्यात सगळ्यात जास्त झळ शेतकरी राजाला बसणार आहे. शासनाने शेतकरी, शेतमजूर आणि छोटे व्यावसायिक यांनाही पॅकेजमध्ये सामावून घेण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.