शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत अतिक्रमण काढण्यात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो.

ठळक मुद्देबाजार ओळीतील : दोन्ही बाजूंनी समान अतिक्रमण हटविण्याची गरज

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या बाजार ओळीतील अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाने काढणे सुरू केले आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
सदर महामार्ग लाखनी ते सोमलवाडा, रेंगेपार, चिखलाबोडी तुमसर मार्गे मध्यप्रदेश असा असून इंग्रजकालीन रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी ५८ फुट असल्याची दिल्ली दरबारी केंद्र शासनाच्या जुन्या इंग्रजकालीन दस्तऐवजाप्रमाणे रस्त्याला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दिक्षित राईस मिल व पांडव राईस मिल यांची सुद्धा युवाको मालमत्तेअंतर्गत नोंद असल्याची चर्चा जुने महसूल अधिकारी व जेष्ठ जाणकार नागरिकांत आहे.
इंग्रजांनी ५८ फूट रुंदी असलेला हा रस्ता व्यापारासाठी मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी राखीव ठेवले असल्याची माहिती जुन्या जाणकार जेष्ठ व्यक्ती सांगत असल्या तरी नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष त्या अतिक्रमणाची कारवाईत पक्षपात केल्या जात असल्याने नगरपंचायत प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे. सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो. बाजार लाइनमध्ये अनेक दुकाने असून दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानसमोर शेड टाकून अतिक्रमण केले होते. दुकानात आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर ठेवली जात असल्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत होती. याचा नागरिकाना कमालीचा त्रास होत होता. मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कर्मचाºयासह जेसीबीच्या सहय्याने काढले जात असले तरी या कारवाईत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात असून नगरसेवक व प्रशासनाकडून मजीर्तील लोकांना मुभा दिली जात असल्याचा आरोप आहे.

रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला सारखे अतिक्रमण काढावे, पार्किंगची व्यवस्था करावी तसेच दुकानांसमोर असलेल्या वाहनांकडून रोखीने दंड वसूल करावा. अशी मागणी नगरीकांकडुन होत आहे. हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक