शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गजन्य आजार, रूग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्स, बाहेर काढू शकतात वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसून भिती दूर होईल. परंतु शासकीय दवाखाने वगळता खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊ स दरदिवशी हजेरी लावत आहे. वातावरणात झपाटयाने बदल घडत आहे. यामुळे नागरिकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरु झाली आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : कोरोनामुळे भीतीचे वातावरण, रुग्ण स्वत:च खरेदी करतात औषध

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दररोज येणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे ताप, सर्दी व खोकला झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीत सदर लक्षणे आढळल्याने चिंता वाढली आहे. खाजगी दवाखाने लॉकडाऊ न असल्याने रुग्ण औषधांच्या दुकानातून स्वत:च औषध घेवून उपचार करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी याची दखल घेण्याची गरज आहे.
कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्स, बाहेर काढू शकतात वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसून भिती दूर होईल. परंतु शासकीय दवाखाने वगळता खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊ स दरदिवशी हजेरी लावत आहे. वातावरणात झपाटयाने बदल घडत आहे. यामुळे नागरिकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरु झाली आहे.
स्वत:चा उपचार स्वत:च
खाजगी रुग्णालये व ओपीडी बंदमुळे नागरिक औषधाच्या दुकानात जावून स्वत:च औषधी खरेदी करती आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यांचेवर ताण येत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकल्यामुळे भिती वाढली आहे. वातावरणात बदल झाल्याने हा आजार होतो परंतु सध्या कोरोनाची धास्ती असल्याने प्रत्येकालाच चिंतेने ग्रासले आहे. तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.सचिन बाळबुध्दे यांनी व रुग्णालयातील इतर डॉक्टरांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आजाराबाबत माहिती सांगितल्यावर उपचाराची माहिती व औषधोपचार सांगण्यात येत आहे.

सक्तीचा आदेश देणार काय?
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील दिवसात यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख वरिष्ठ दोन अधिकाºयांनी संबंधित जिल्हयात कडक उपाययोजना व कारवाईचे आदेश केंद्र शासनाने दिल्या आहेत.

दातांचे दवाखाने बंद
तुमसर शहरातील दातांचे रुग्णालये सध्या बंद आहेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव तोंडावाटे होतो. त्यामुळे मोठी संसर्ग त्यातून होण्याची शक्यता अधिक आहे. खबरदारी म्हणून सध्या दातांचे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे.

दिशानिर्देश कोण देणार
तुमसर शहर व ग्रामीण परिसरात सध्या आरोग्य सेवेचा भार शासकीय रुग्णसेवेवर येवून पडला आहे. शहरात व ग्रामीण भागात अनेक खाजगी, ओपीडी आहेत. ते बंदमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य शासनाने खाजगी डॉक्टरांनी आरोग्य सेवा पूरविण्याची विनंती केली आहे परंतु ती अद्याप सुरु झाली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या