शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सर्दी-तापाचे संकट वाढले; रुग्णालयांमध्ये वाढतेय मुलांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या १२ वर्षापर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात येते.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत महिनाभरापासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना विविध आजारांनी घेरले आहे. सर्दी, ताप, खोकला यासह डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दिसत आहे. अतिसारही डोके वर काढू पाहत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यामध्ये आजारी मुलांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गत आठवडाभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या १२ वर्षापर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे सांगण्यात येते.

डेंग्यूच्या साथीला अतिसार, हिवताप - अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मुलांपासून ते वृद्धापर्यंतच्या लोकांना डेंग्यूसदृश्य आजाराने ग्रासल्याने उदाहरणे पहावयास मिळत आहे. - साथीचे आजार लक्षात घेता आरोग्य विभाग यंत्रणा सतर्क झाली असून उपाययोजनेत व्यस्त झाली आहे. वातावरण बदलाने व्हायरल फिवर वाढले आहेत. तापासह आता डेंग्यूच्या साथीला अतिसार व हिवतापही आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. ओपीडीत दररोज ५० ते ६० रुग्ण- जिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, ताप, खोकला असलेल्या जवळपास ५० ते ६० रुग्ण रोज येत आहेत. त्यांच्यावर परिचारकांमार्फत लक्ष ठेवले जाते.

पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी ध्यावीवातावरणाच्या बदलामुळे सध्या रुग्ण संख्या वाढली आहे. खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात दररोज जवळपास २५० पेक्षा जास्त मुले सर्दी, ताप, खोकला झाल्याने उपचारासाठी येतात. तसेच डेंग्यूसदृश्य आजाराचीही साथ आहे. पालकांनी स्वच्छतेबाबत काळी घ्यावी.- यशवंत लांजेवार, बालरोग तज्ज्ञ, भंडारा

 

टॅग्स :Healthआरोग्य