शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देआठवडी बाजार बंद : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोना व्हायरसने भर घातली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोनदा भरणारे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठाशेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे शहरात भरत असणारा बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरला नसल्याने शेतकºयांच्या भाजीपालाचे नुकसान झालेले आहे.

भाजीपाला विक्रीअभावी आर्थिक फटका
शहरात बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणांसह आठवडी बाजारावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काठणीवर आलेला भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक कमी वेळात कमी होणारा असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकºयांच्या पीकांचे मातीमोल होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी