नागरिकांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात कोरोनाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:08+5:302021-03-14T04:31:08+5:30

जवाहरनगर : नागरिक कोरोना नियमांचे पालन करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी ...

Increase of corona in Thane due to negligence of citizens | नागरिकांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात कोरोनाची वाढ

नागरिकांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात कोरोनाची वाढ

जवाहरनगर : नागरिक कोरोना नियमांचे पालन करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी दुसऱ्यांदा कन्टेन्मेंट झोन लावण्यात आले आहे. गावात लाॅकडाऊन लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणा पेट्रोलपंप हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. येथील नागरिक नागपूर भंडारा व इतर राज्यातील नागरिक ये-जा करीत आहेत.

येथे स्थानिक बाजारपेठ, दुकानदार व बाईक चालवणारे नागरिक कोरोना नियमाचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील महिन्यात एकाच घरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. परिसरातील लोकांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असता त्यात आणखी चार रुग्ण आढळून आले.

१२ मार्च रोजी पुन्हा ठाणा येथील दुसऱ्या भागात एकाच घरातून पाच नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ठाणा येथे रुग्णिसंख्या वाढत असल्याने दुसऱ्यांदा ठाणा येथे कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गावात लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Increase of corona in Thane due to negligence of citizens