शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भावातीत ध्यानात जीवनाची महत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:40 IST

सूक्ष्म प्रेरणेतून प्राप्त झालेले ज्ञान चिरकाल टिकेल याची शाश्वती नसली तरी भावातीत ध्यानाच्या माध्यमातून मनाला मिळणारा आनंद मनुष्याला सुखी व समृद्ध बनवू शकतो.

श्रृती ओहळे यांचे प्रतिपादन : महर्षि विद्या मंदिरात ध्यान साधना शिबिराचा समारोपभंडारा : सूक्ष्म प्रेरणेतून प्राप्त झालेले ज्ञान चिरकाल टिकेल याची शाश्वती नसली तरी भावातीत ध्यानाच्या माध्यमातून मनाला मिळणारा आनंद मनुष्याला सुखी व समृद्ध बनवू शकतो. महर्षी महेश योगी यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे सोपे नाही. भावातीत ध्यानात जीवनाची महत्ता आहे. भावातीत ध्यानाचा वापर करून जीवनात आनंदाची प्राप्ती करावी, असे मार्गदर्शन प्राचार्य श्रृती ओहळे यांनी केले. फुलमोगरा स्थित महर्षि विद्या मंदिरात विश्वशांती अभियान अंतर्गत आयोजित पाच दिवसीय भावातीत योग प्राणायाम उपक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी योगशिक्षक रमेश कावळे, सतीश श्रीवास्तव यांनी ध्यान साधना, भावातीत ज्ञानाचे फायदे, प्राणायाम याबाबत माहिती दिली. या शिबिराचा नागरिकांसह, पालक तथा शाळेतील शिक्षकगण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे महर्षि महेश योगी यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या औचित्याने शाळेच्या सत्रात दर आठवड्याला विद्यार्थ्यांसाठी योग प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत भावातीत ध्यान योग विज्ञाननिष्ठ अभ्यासाचाही समावेश असतो. यासंदर्भात योगशिक्षक रमेश कावळे म्हणाले, महर्षि योगी यांनी संपूर्ण जगाला भावातीत ध्यान आणि आॅर्ट आॅफ लिव्हींग, योग विज्ञानचे महत्व सांगितले आहे. आजच्या तणावयुक्त वातावरणातून मानव सहजपणे सुटका करू शकतो. उत्तम चारित्र्याची निर्मती करण्याचे ‘प्रगाढ’ शक्ती भावातीत ज्ञानात आहे. उत्तम चारित्र्यातून उत्तम नागरिक व त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. समाजात मानवी विकास तर लवकर होतोच तद्वतच समाजसंस्था बळकट होण्यास बळ मिळत असते. महर्षिंनी योग विज्ञानाच्या माध्यमातून माणसिक ताण-तणाव, अन्य व्याधी यावर नियंत्रण मिळविण्याचे गुढ सांगितले आहे. दैनंदिन जीवनात भावातीत ध्यानाचा वापर झालाच पाहिजे, असे आग्रही मतही ओहळे यानी व्यक्त केले. या शिबिरासाठी शिक्षक सतीश श्रीवास्तव, संगीत शिक्षक विनोद पत्थे, अनिता वाघमारे, जयश्री जोशी, प्रज्ञा संगीतवार, संध्या भोवते, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)