शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शालेय शिक्षकांना मिळणार ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध्ये ओळखपत्र दिले जाणार आहे.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : एक हजार १५७ शाळांचे चार हजार ५४७ शिक्षकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : समग्र शिक्षा अभियानाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांच्या शिक्षकांना शासनाच्या वतीने ओळखपत्र दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील एक हजार १५७ शाळांच्या चार हजार ५४७ शिक्षकांना ओळखपत्र देण्यासाठी दोन लाख २७ हजार ३५० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.शालेय शिक्षणात अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध्ये ओळखपत्र दिले जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे ओळखपत्र जिल्हा अथवा तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. प्रती ओळखपत्रावर अधिकाधिक ५० रुपये खर्च करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या ओळखपत्राबाबत वस्तुनिष्ठ लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, तहसीलच्या सर्व शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यासाठी लागणारा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या गळ्यात आता शासनाचे अधिकृत ओळखपत्र दिसणार आहेत. आतापर्यंत काही उपक्रमशिल शिक्षक विद्यार्थ्यांसह आपले ओळखपत्र तयार करून घेत होते. त्यात सुसुत्रता नव्हती. त्यामुळे प्रत्येक शाळेचे ओळखपत्र वेगळे दिसत होते. आता यामुळे सर्व ओळखपत्र एकसारखे दिसतील.शासकीय, १०० टक्के अनुदानीत शाळांच्या शिक्षकांना ओळखपत्र तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निधी पाठविण्यात आला आहे. या सत्रातच सर्व शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येईल.-वीरेंद्र गौतम,सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा विभाग भंडारा

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषद