खाकी वर्दीने जोपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:49+5:30

देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात भोजनाची व्यवस्था तर केलीच मात्र त्या मजुरांना मध्यप्रदेश सीमेत वाहणाने नेऊन सोडले. देव्हाडा येथील रेल्वे कंत्राटदाराकडे छिंदवाडा येथील सात मजूर कामासाठी होते.

Humanity with khaki uniform | खाकी वर्दीने जोपासली माणुसकी

खाकी वर्दीने जोपासली माणुसकी

Next
ठळक मुद्देछिंदवाड्याच्या २२ मजूरांना दिले भोजन : मजुरांनी मानले पोलिसांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्यातील सर्व कंत्राटदाराने आपली कामे बंद केली. याचा फटका तुमसर येथील रेल्वे कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या छिंदवाडा येथील २२ मजूरांना बसला. जिल्हाबाहेरील मजुरांना आपल्या मुळगावी परतण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. गावाकडे जावे म्हटले तरी पोलिसांची भीती. इथेच रहावे म्हटले तर जवळील राशन संपले. मजूरी नाही, दिवसामागून दिवस जात असल्याने अखेर गुरुवारी रात्री छिंदवाडा येथील मजूरांनी आपल्या मुळगावी जाण्याचा निर्णय घेतला. देव्हाडी उड्डाणपूलाजवळ स्थानिक युवकांना ते मजूर जातांना दिसले. तात्काळ एका तरुणाने प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता प्रतिनिधीने तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच त्या मजुरांची भोजनाची व्यवस्था केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात भोजनाची व्यवस्था तर केलीच मात्र त्या मजुरांना मध्यप्रदेश सीमेत वाहणाने नेऊन सोडले. देव्हाडा येथील रेल्वे कंत्राटदाराकडे छिंदवाडा येथील सात मजूर कामासाठी होते. जिल्ह्यात २५ मार्च रोजी लॉक डाऊन झाल्यानंतर काम बंद झाले. मजुरांनी दोन दिवस काम सुरु होण्याची प्रतीक्षा केली. मात्र आता काम सुरु होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जवळील सर्व खाण्यापिण्याचे सामान संपल्याने अखेर गावाकडे निघून जाण्याचा निर्णय घेतला. अशा भयभीत मनस्थितीत असलेले मजूर स्थानिक रहिवासी राजेश कुंभारे यांना दिसले. त्यांची विचारपूस करताच त्यांनी आपली आपबिती सांगितली. पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ देव्हाडी उड्डाणपूला जवळ भेट दिली.
येथे मजुरांशी चर्चा करुन त्यांना मध्यप्रदेशात सोडण्याचे आश्वासन दिले. आणि ते पुर्णही केले.

मध्यप्रदेश सीमेत सुखरुप पोहचविले
छिंदवाडा येथील कामगार गुरुवारी रात्री तुमसर पोलिसांना गस्ती दरम्यान आढळले. यावेळी पोलिसांनी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करुन त्यांना सुखरुप मध्यप्रदेशातील सीमेत सोडण्यात आले. यावेळी कंत्राटदाराला संपर्क केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र पोलिसांनी शोध घेऊन सदर कंत्राटदाराला नक्कीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांनी दिली.
 

Web Title: Humanity with khaki uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.