शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर येथील बागायती शेतकरी होत आहेत हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास घेऊन एकमेकांच्या सहयोगातून सुधारतो आहे. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी पारंपरिक अभ्यासासोबत नव तंत्रज्ञान स्वीकारीत आहेत. पीक जोमदार यावे, यासाठी नव्या तंत्राचे सहकार्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. एकट्या पालांदूर येथे सुमारे २०० एकर जागेत बागायती शेती केली जाते. यात विविध पिके उत्पादित केली जातात.

ठळक मुद्देनव्या तंत्राचा वापर : भरघोस उत्पन्नाची हमी, पिकाला क्राप कव्हर

मुखरू बागडे लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : नव्या बदलत्या हवामानाचा अभ्यास करत नवे काही करण्याच्या प्रेरणेने पालांदूर येथील शेतकरी हायटेक होत आहेत. मल्चिंग, ड्रीपसोबत आता कागदी आवरण पिकांना देत पीक संरक्षणाकरिता शेतकरी सरसावलेला आहे. क्राप कव्हरमुळे पिकांना किडीपासून व उन्हापासून थेट संरक्षण मिळत आहे.शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास घेऊन एकमेकांच्या सहयोगातून सुधारतो आहे. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी पारंपरिक अभ्यासासोबत नव तंत्रज्ञान स्वीकारीत आहेत. पीक जोमदार यावे, यासाठी नव्या तंत्राचे सहकार्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. एकट्या पालांदूर येथे सुमारे २०० एकर जागेत बागायती शेती केली जाते. यात विविध पिके उत्पादित केली जातात. चुलबंद खोरे भाजीपाला उत्पादनाकरिता जिल्ह्यात परिचित आहे. चुलबंद खोऱ्यात पालांदूर, मऱ्हेगाव, वाकल, नरव्हा, पाथरी, खोलमारा, भुगाव, विहीरगाव, ढिवरखेडा आदी गावांत बारमाही भाजीपाल्याची शेती केली जाते. शेतकरी थेट बीटीबी सब्जी मंडी येथे जोडला आहे. दररोज हजारो किलो भाजीपाला संपूर्ण जिल्ह्याला चुलबंद खोऱ्यातून पुरविला जातो. भाताची शेती कमी करून बागायती शेतीकडे लक्ष वाढविलेले आहे. मिरची, कारले पीक लावले आहे. या पिकाला पांढऱ्या माशीपासून संरक्षण  मिळण्याकरिता क्राप कव्हर लावलेले आहे. सरळ पंचेचाळीस दिवसांपर्यंत या पिकाला क्राप कव्हरमध्ये सुरक्षा मिळणार आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याने नवे काही करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे शेतकरी टिकाराम भुसारी यांनी सांगितले. खर्च कमी व्हावा, फवारण्या अधिक होऊ नये. विषमुक्त भाजीपाला उत्पादित व्हावा याकरिता नव्या तंत्रात क्राप कव्हर खरेदी करून लावलेले आहे. एका झाडाला सुमारे सहा ते सात रुपये एवढा खर्च क्राप कव्हरसाठी आलेला आहे. यामुळे कीड व उन्हापासून संरक्षण मिळून पीक जोमदार येईल, अशी आशा आहे, असे सतीश भुसारी या शेतकऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेती