शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच योजना जिल्ह्यातून गुंडाळणार!

By admin | Updated: January 6, 2016 00:52 IST

घरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला.

हमालांनी पुकारला संप : घरपोच योजनेच्या समस्या कायमराहुल भुतांगे तुमसरघरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला. परिणामी हमाल कामगारांनी परत एकदा कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे ग्रामीण भागात अजुनही धान्य पोहचते झाली नाही. कंत्राटदार अधिकाऱ्यावर भारी ठरत असल्याने हमाली व वाहतुकीचे कंत्राट रद्द करणार असल्याने जिल्ह्यातून योजना गुंडाळणार असेच चिन्ह दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात घरपोच योजनेचा शुभारंभ करण्यात आला परंतू सदर योजनेत योग्य दिशा निर्देश नसल्याने हमाल कामगार व स्वस्त धान्य दुकानदारात संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी हमाल कामगारांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले असता हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे पाहून स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हमाल कंत्राटदाराला मिळत असलेल्या हमालीच्या रकमेतून जास्त हमाली देण्यास भाग पाडले होते. हमाल कंत्राटदारानेही नागपूर येथे अधिवेशन असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्देशांचा मान ठेवून होकार दिला. त्यामुळे उशिरा का होईना ग्रामीण भागात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धान्य पोहचते झाले व वितरितही झाले. मात्र ईकडे हमाल कंत्राटदाराने हमालांना आगावू हमाली दिली नाही. त्यामुळे आणखी हमाल कामगार संप पुकारणार. हे धान्य दुकानदारांना माहित असल्याने त्यांनी अगोदरच अधिकाऱ्यांना निवेदने देवून दुकानदाराच्या समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दुकानदारांची बैठक बोलावून दुकानदारांना आश्वासित केले की हमाली आदी खर्च हा संबंधित कंत्राटदारानेच करावा, असे आदेश काढले होते. परंतू कंत्राटदाराने त्या आदेशाला केराची टोली दाखवित हमालांनी मिळत असलेली हमाली दोन रूपये ३० पैसे पेक्षा जास्त देणारच नाही, असे स्पष्ट सांगून टाकल्याने परत जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून हमालांनी संप पुकारले. वाहनात धान्य चढविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वाहनांना खाली परतावे लागले तर आज ५ जानेवारीला वाहतूक कंत्राटदाराने गोडावूनमध्ये वाहने पाठविलेच नाही. परिणामी ७० धान्य दुकानदारांच्या चालान रक्कम भरूनही अजुनपर्यंत ग्रामीण भागात धान्य पोहचते झालेच नसल्याने परत एकदा ग्रामीण जनतेला उपासमारीचा सामा करावा लागणार एवढे मात्र निश्चित.