त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:08+5:30

भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गांधी चौक पताकांनी सजविण्यात आला होता.

The hero of the Treta era was hailed all over the district | त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

त्रेता युगाच्या महानायकाचा जिल्ह्यात सर्वत्र जयघोष

googlenewsNext
ठळक मुद्देभगव्या पताकांनी सजले चौक, रस्त्यारस्त्यांवर रांगोळ्या, गांधी चौकात महाआरती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राममंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त जसजसा जवळ येत होता तसतशी भाविकांची उत्सूकता शिगेला पोहचली. अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि भंडारा शहरासह जिल्ह्यात श्रीराम नामाचा जयघोष झाला. फटाक्यांची आतषबाजी करून रामभक्तांनी स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव साजरा केला.
भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गांधी चौक पताकांनी सजविण्यात आला होता. १२.४० वाजता अयोध्येत भूमिपूजन झाले आणि फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. खासदार सुनील मेंढे, भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश वंजारी यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी आणि श्रीराम भक्त येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. खात रोडवरील रामायण नगरीत मंगलवेष परिधान करून स्त्री पुरुष एकत्र आले होते. श्रीरामाच्या जयघोषात फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. येथे नगरसेवक संजय कुंभलकर, नगरसेविका साधना त्रिवेदी, संतोष त्रिवेदी आदी उपस्थित होते. बीटीबी सब्जीमंडीत पूजा पाट, शंखनाद करून उत्सव साजरा केला. यासह शहरातील खामतलाव चौकातील बहिरंगेश्वर मंदिर, केशवनगर चौक, शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, हेडगेवार चौक, जलाराम चौक, चांदणी चौक, जिल्हा परिषद चौकासह ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.

भंडारा येथील खामतलाव चौकातील बहिरंगेश्वर देवस्थान परिसरातील राममंदिरात शहरातील श्रीराम भक्तांनी एकत्र येऊन तेथे आरती करून श्रीरामाचे पूजन केले. त्यानंतर शहरातील विविध चौकात जाऊन तेथे लावण्यात आलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोठा बाजार परिसरालगतच्या श्रीराम मंदिराला रोषनाईने सजविण्यात आले होते. येथे आरती करण्यात आली.

भंडाऱ्याचे खासदार राममंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले होते. जोवर राममंदिर निर्माण होणार नाही तोवर शेंडी ठेवण्याचा निर्धार वयाच्या २४ व्या वर्षी केला. राममंदिरासाठी विविध आंदोलनात सहभागी झाले. बुधवारी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी आपली शेंडी कापून संकल्पपूर्ती केली.

लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. २५ ऑक्टोबर १९९० रोजी पालांदूर येथून कृष्णाजी जांभुळकर, तामेश्वर रणदिवे यांच्या नेतृत्वात २० कारसेवक अयोध्या येथे रवाना झाले होते. त्यांच्या कार्याची आज पालांदूरवासीयांना आठवण झाली. या कारसेवकांचा कार्यक्रमस्थळी श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कृष्णाजी जांभुळकर, माधव नवखरे या कारसेवकांनी त्यावेळच्या घटनेचा क्रम सांगून आठवणींना उजाळा दिला. सरपंच पंकज रामटेके, दामाजी खंडाईत, उपसरपंच स्वप्नील खंडाईत, तु.रा. भुसारी, माजी सरपंच वैशाली खंडाईत, नितीन रणदिवे यांच्या हस्ते सत्कार केला.

जिल्ह्यातील प्रत्येक राममंदिरात श्रीराम भक्तांनी जाऊन श्रीरामाचे पूजन केले. तुमसर येथील रामकृष्ण नगरातील पुरातन राममंदिरात सुंदरकांड, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. पूजारी राघवेंद्र पांडे यांच्या उपस्थितीत होम हवन करण्यात आले. जवाहरनगर ठाणा येथील टी पॉइंटवर रामभक्त तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी व शंखनाद करून जल्लोष केला. सुंदरकांड पठण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते.

Web Title: The hero of the Treta era was hailed all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.