शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाढव्याला सराफा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

बाजार बंदचा परिणाम झाल्याने जवळपास दीड ते दोन कोटींचा फटका बसणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. तुमसर येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोन कोटींची उलाढाल ठप्प : तुमसर सोने खरेदीची प्रमुख बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संसर्गाचा फटका सराफा बाजाराला पहिल्यांदाच बसत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजार बंद राहण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा सराफा बाजार तुमसर येथे असून तुमसरमध्ये ४० ते ४२ सोन्याचे दुकाने आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या फटक्याने सराफा बाजाराची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
बाजार बंदचा परिणाम झाल्याने जवळपास दीड ते दोन कोटींचा फटका बसणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. तुमसर येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहे.
नववर्षातील गुढीपाडव्याच्या या सणाला कोरोनाचे सावट पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर आनंदाची गुढी उभारून सण साजरा करण्याची पद्धत आहे. अनेकजण गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी, वाहन खरेदी तसेच घर, जागा खरेदी करण्यासाठी इच्छूक असतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केलेली खरेदी शुभ मानली जाते.
तुमसरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदीची मोठी आर्थिक उलाढाल होते. अनेक सराफा व्यापाºयानी गुढीपाडव्याच्या सणासाठी मोठी जय्यत तयारी केली होती. वर्षातून एकदा येणाºया गुढीपाडवा सणाची अनेकांना आतुरता लागलेली असते. भारतीय संस्कृतीत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. तुमसर शहरात कोरोना संसर्गामुळे सराफा बाजारपेठेला मोठा फटका बसला असल्याची व्यापाऱ्यांनी माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे अनेक जणांना यावर्षी सोने खरेदी करता येणार नाही. मध्यप्रदेशातील खरेदी करिता येणाºया ग्राहकांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खरेदीदारांसह सराफा व्यवसायीकांचा मोठा हिरमोळ झाला आहे. त्यामुळे सोन्याची झळाळी यावर्षी तरी चकाकणार नाही, असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या