हमीभाव, खरेदी केंद्र्राची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:00+5:30

खाजगी जिनींग मालकाद्वारे हमी भावाला खुलेआम मुठमाती देवून चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपयांनी कापूस खरेदी केला जातो आहे. (नाबार्ड) महाराष्ट्र शासनाद्वारे जे खरेदी केंद्र सुरू केले आहे, ते अत्यंत कमी आहे. खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना हमी भाव देण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन क्रांती मोर्चा तुमसरतर्फे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना देण्यात आले.

Guarantee, increase the number of shopping centers | हमीभाव, खरेदी केंद्र्राची संख्या वाढवा

हमीभाव, खरेदी केंद्र्राची संख्या वाढवा

googlenewsNext
ठळक मुद्देतुमसरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासनाने कापसाला पाच हजार ३५० रुपये हमी भाव घोषित करण्यात आला आहे. परंतु खाजगी जिनींग मालकाद्वारे हमी भावाला खुलेआम मुठमाती देवून चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपयांनी कापूस खरेदी केला जातो आहे. (नाबार्ड) महाराष्ट्र शासनाद्वारे जे खरेदी केंद्र सुरू केले आहे, ते अत्यंत कमी आहे. खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना हमी भाव देण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन क्रांती मोर्चा तुमसरतर्फे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना देण्यात आले.
त्यामुळे हवालदील शेतकरी खाजगी जिनिंग कंपनींना कापूस विकत आहेत, परिणामी शासनाने शेतकऱ्यांच्या होणारी लूट तात्काळ थांबवावी. राज्यात यावेळी मान्सून वेळेत आहे व शेतकऱ्याकडे हजारो क्विंटल कापूस शिल्लक आहे. अश्या वेळेस शासनाकडे शेतकन्यामार्फत सातबारा द्वारे नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, जिनिंग मालकाद्वारे कमी भावात खरेदी केंद्रावर अंकुश आणावा. कोविड-१९ (लॉकडाऊन) चा विचार करत यासंदर्भात शेतकरी संयम ठेवून आहे, वेळ फार कमी आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा संयमचा उद्रेक होवून ते जर रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी आले तर त्याला संपूर्ण जबाबदार सरकार राहिल. यावेळी रविदास लोखंडे, सुभाष भिवगडे, कृष्णा समरीत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Guarantee, increase the number of shopping centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.