शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरात हरियाली योजना गुंडाळली

By admin | Updated: November 10, 2014 22:37 IST

बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन

चुल्हाड (सिहोरा) : बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन या परिसराचा विकास पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत करण्यात येणार आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात आहेत. याशिवाय सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मानाचा तुरा रोवत आहे. यामुळे उपजावू शेतीला महत्व आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर पाणलोट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सिहोरा मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत ७३ गावापैकी २९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पाणलोट योजनेत तामसवाडी, रेंगेपार, पांजरा, परसवाडा, वाहनी, मांडवी, पिपरी चुन्ही, वांगी, टेमणी, मांगली, मोहाडी खापा, खापा मोहाडी, गोंदेखारी, चुल्हाड, सुकळी नकुल, गोंडीटोला, देवरी देव, देवसर्रा, महालगाव, ब्राह्मणटोला, बिनाखली तथा सामाजिक वनिकरण विभाग संलग्नित योजनेत मोहगाव खदान, रूपेरा, कर्कापूर, हरदोली, सिंदपुरी, सिहोरा, सितेपार, मच्छेरा गावांचा समावेश आहे. या पाणलोट योजनेत शेतकऱ्यांच्या शेतातील लहान धुरे आकाराने मोठे करणे, पडीक जमिन उपजावू तयार करणे, सिमेंट बंधारे, वळन बंधारे, भूमिहिन गावकऱ्यांना आर्थिक मदत, बचतगटांना निधी, शेततळे तथा अन्य विाकसाची कामे केली जाणार आहेत. गावात ग्रामसेवक पाणलोट समितीची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेचा सन २०१३-१४ ते २००१७-१८ असा कालावधी आहे. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत गावा गावात समित्या गठित करण्यात आलेल्या आहे. खापा गाव रिठी असताना या गावातील शेती योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहे. या शेतीत विकास कामावर नियंत्रण मोहाडी खापा गावातील पाणलोट समिती ठेवणार आहे. दरम्यान पाणलोट समिती निवड प्रक्रियेला १० महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असताना गावात विकास कामांचा पत्ता नाही. या समितीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. कामे न करताच १ वर्ष निघून गेला आहे. विकास कामाचा कृती आराखडा तयार करताना ६ कोटी २६ लाख ८१ हजार रूपयाचा निधी मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र गावांच्या विकासाकरीता आॅगस्ट २०१४ या महिन्यात केवळ ३ लाख ४४ हजार रूपये प्राप्त झाले आहे. या निधीतून पाणलोट सचिवाचे महिनाभराचे वेतन, प्रशासकीय खर्च, बैठका, प्रशिक्षण आदीवर खर्च करण्यात आले आहे. या परिसरात हरियाली योजना सुरू असताना शेततळे तयार करण्यात आले होते. या शेततळ्यात पाणीच नाही या योजनेत लक्षावधीचे वारे न्यारे झाले आहेत. आता ही योजनाच बंद करण्यात आल्याने घबाड इतिहासजमा होणार आहे. (वार्ताहर)