नातीच्या साक्षगंधात आजोबांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST2021-02-06T05:06:44+5:302021-02-06T05:06:44+5:30

भगवान मारोती बगमारे (६१ वर्षे, रा. लाखांदूर) असे मृत आजोबांचे नाव आहे. ते सरांडी येथे साक्षगंधासाठी आले होते. कार्यक्रमाची ...

Grandfather dies in grandson's testimony | नातीच्या साक्षगंधात आजोबांचे निधन

नातीच्या साक्षगंधात आजोबांचे निधन

भगवान मारोती बगमारे (६१ वर्षे, रा. लाखांदूर) असे मृत आजोबांचे नाव आहे. ते सरांडी येथे साक्षगंधासाठी आले होते. कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच बगमारे यांना अस्वस्थ वाटू लागले. स्थानिक डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लाखांदूर येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. ते मूळचे विरली (बु.) येथील रहिवासी होते. येथील प्रवचनकार मिन्नाथजी बगमारे महाराज यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. ते सेवानिवृत्त शिक्षक तसेच वारकरी सांप्रदायातील होते.

या घटनेमुळे विरली (बु.) येथील बगमारे आणि सरांडी (बु.) येथील बुराडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर लाखांदूर येथील चूलबंद नदीतीरावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Grandfather dies in grandson's testimony