शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅसिटीची तक्रार देण्याची धमकीसुद्धा उपोषणकर्त्यांना देत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी(मोठी) : येथील वाॅर्ड क्रमांक दोनमधून शेतावर जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर सिद्धार्थ राजहंस लोणारे यांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतावर ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यानुसार येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत दिघोरीला वारंवार सूचना व लेखी अर्ज दिले. परंतु, याचा काहीही उपयोग न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोरच तंबू उभारून हे अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण सुरू केले. शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात करताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे झाले व उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लाखांदूरचे नायब तहसीलदार एन. टी. पाथोडे, दिघोरीचे ठाणेदार  हेमंत पवार, सरपंच अरुण गभने, ग्रामविकास अधिकारी अनिल धमगये, तंटामुक्त अध्यक्ष महादेव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक चिमनकार, पद्माकर चेटुले, संदीप पुरामे आणि सिद्धार्थ लोणारे यांच्यात दिघोरी ग्रामपंचायतीत चर्चा झाली. यामध्ये सिद्धार्थ लोणारे यांनी सहकार्य न दाखविल्याने पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन अतिक्रमण काढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅसिटीची तक्रार देण्याची धमकीसुद्धा उपोषणकर्त्यांना देत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते. शेतात जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सुनील फुलबांधे, योगेश फुलबांधे, अनिल फुलबांधे, खुशाल चिमणकर, विलास फुलबांधे, विनोद फुलबांधे, देवेंद्र फुलबांधे, चंद्रशेखर फुलबांधे,  रोहित फुलबांधे उपोषणाला बसले होते. रस्त्याचा प्रश्न प्रशासनाने तत्काळ सोडविण्याची मागणी आहे.

अतिक्रमण काढण्याचा एकमताने निर्णय- सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण असल्याची तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार दिल्यानंतरही अतिक्रमण संबंधित लोणारे यांना सांगण्यात आले होते. मात्र विरूद्ध तक्रार आल्यानंतर प्रकरण तापले. तसेच लोणारे यांचे सहकार्य न मिळाल्याने सरत्याशेवटी पोलीस विभागाला सहकार्याच्या आधारावर एकमताने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत