शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण

By admin | Updated: February 25, 2015 00:56 IST

प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तुमसर : प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापावेतो लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही.भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) प्रणीत तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संघटनेचे सहसचिव रामलाल बिसेन यांच्या नेतृत्वात सुमारे ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी तुमसर पंचायत समिती समोर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता साखळी उपोषण सुरु केले. यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन राहनीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची थकबाकी देणे, कर्मचारी भरतीत भेदभाव न करता जाहीरात देऊन भरती करणे, कर्मचाऱ्यांचा निधी इतरत्र खर्च न करता तो राखीव ठेवणे, रोजंदारी कर्मचाऱ्याला नियमीत करावे, जिथे ग्रामपंचायतीत पदभरती केली नाही तिथे शासनाचा निधी पाठविण्यात आला तो चुकीचा आहे. कर्मचारी पदभरती पूर्व परवानगीने करावी, लिपिकाचे पद जाहीरात देऊन भरणे, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. खंडविकास अधिकारी रजेवर गेल्या होत्या त्यामूळे उपोषणकर्त्यांची कुणीच दखल घेतली नाही. मंगळवारी खंडविकास अधिकारी रूजू झाल्या. मंगळवारीच पंचायत समितीचीस ची आमसभा होती. आमदार चरण वाघमारे आमसभा संपल्यानंतर भेट देणार असल्याची माहीती आहे. तालुक्यातील मिटेवानी ग्राम पंचायतीच्या च्या दोन कर्मचाऱ्यांचे सन २०१० पासून भविष्य निर्वाह निधी वेतनातून कपात करण्यात आले, परंतु त्यांच्या खात्यात अद्याप जमा झाला नाही, हे येथे उल्लेखनीय. हा निधी गेला कुठे याची चौकशीची मागणी संघटनेने केली आहे. तथा दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)