शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

हरदोलीत शेतकी खरेदी विक्रीचे 'गोडावून सील'

By admin | Updated: November 26, 2015 00:38 IST

स्थानिक शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर अंतर्गत हरदोली (सि.) येथील आधारभूत केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यामागे एक किलो धान...

राहुल भुतांगे तुमसरस्थानिक शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर अंतर्गत हरदोली (सि.) येथील आधारभूत केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यामागे एक किलो धान अधिकचे घेवून ३०० पोती धानाचा अनाधिकृत साठा संस्थेच्या व्यवस्थापक व अध्यक्षांनी जमा केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्या आधारे तहसिलदार व पुरवठा निरीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीत ३०० पोती अंदाजे १७५ क्विंटल धान हा गोडावूनमध्ये अनाधिकृतरित्या आढळून आले. पंचनामा करून गोडावूनला सिल ठोकून धान जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली.सन २०१४-१५ च्या सत्रात हरदोली सिहोरा येथे तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर या संस्थेद्वारे धान आधारभूत केंद्र सुरू करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या मनमर्जी धोरणामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला आधारभूत केंद्रावरील धान घेण्यास कुचराई करित होते. प्रती पोतीमागे एक किलो धान शेतकरी अधिक देत असेल तर त्यांच्याच धान खरेदी करित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पोतीमागे १ किलो अनाधिकृत धान अधिकचे गोळा केले. त्या १ किलो धानाचे पर्यावसन ३०० बोरे धान म्हणजे अंदाजे १७५ क्विंटल अनाधिकृत धान जमा केले. ते धान गोडावूनमध्ये पडून ठेवलेला होते. एकीकडे संस्थेच्या रेकार्डला पुर्ण धान मिलर्सना दिल्याचे दाखविण्यात आले आहे. संस्थेच्या रेकार्डमध्ये धान शिल्लक नसल्याचे दाखविण्यात आली तर मग हे धान आले कुठून, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष रविदयाल पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार नोंदवून दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यासंदर्भात मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिले असता त्या आदेशाची अंमलबजावणी करित तहसिलदार सोनवाने व पुरवठा निरीक्षक सुनिल लोहारे यांनी घटना स्थळाला भेट देवून तपासणी केली. तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्रीच्या हरदोली (सि.) येथील गोडावूनमध्ये ३०० बोरे अनाधिकृत धान आढळून आले. त्यानंतर गोडावूनला सिल ठोकून धान जप्त करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी संस्थेच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करित असल्याची चुणूक होती. मात्र अध्यक्ष व व्यवस्थापकांनी केलेले हे कार्य आपल्याही अंगलट येवू शकते, आपणही कुठेतरी फसु शकतो म्हणून संस्थेचे खुमन तुरकर, हरकसिंग मडावी, गिता राहांगडाले, रमेश बावणे, केसर पारधी, निलकंठ मोरे, सुखदेव रहांगडाले व शालिकराम भगत या आठही सदस्यांनी कारवाई होण्याआधीच राजीनामे सोपविल्याने प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.