शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी शौचालयाचा वापर करावा - खोब्रागडे

By admin | Updated: March 28, 2015 00:38 IST

किशोरवयीन मुलगी ही उदयाची माता आहे. म्हणूनच लहानपणापासूनच चांगल्या सवयी, चांगले आरोग्य ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे.

कोंढा-कोसरा : किशोरवयीन मुलगी ही उदयाची माता आहे. म्हणूनच लहानपणापासूनच चांगल्या सवयी, चांगले आरोग्य ठेवणे हे तिचे कर्तव्य आहे. खेड्यात अनेक घरी शौचालय असून सुध्दा शौचालयाचा वापर केला जात नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडते. तेव्हा ग्रामीण भागातील मुलींनी शौचालयाचा वापर करावा, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी खोब्रागडे यांनी व्यक्त केले.आरोग्य पंधरवडा अभियानाचे औचित्य साधून आरोग्य विभाग व संत तुकाराम हायस्कूल ब्रह्मी येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव (चौ.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता शेट्टीवार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश खोब्रागडे, दादा धोटे, सुनीता धावळे, आशा पर्यवेक्षिका रेखा तिघरे, आरोग्य सेविका ललिता लोणारे, दीपा रामटेके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयातील ८ ते १० वर्गाच्या विद्यार्थिनी, आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका व गावातील महिला यांच्यासाठी विद्यालयात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. डॉ. अनिता शेट्टीवार यांनी मुलीना वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या बदलाविषयी माहिती दिली. सामाजिक स्वास्थ्य योग्य राखण्यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधणे आवश्यक आहे. प्रास्ताविक आशा सेविका लक्ष्मी घावळे संचालन मीना तिपात्रे तर आभार कांता घावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.