मुलींनी आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:44+5:302021-02-05T08:40:44+5:30

न्या. एन. के. वाळके : सिहोऱ्यात बालिका दिनाचे आयोजन चुल्हाड (सिहोरा) :- ग्रामीण भागातही घराघरात शिक्षणाचा प्रचार होत ...

Girls should be self-reliant | मुलींनी आत्मनिर्भर व्हावे

मुलींनी आत्मनिर्भर व्हावे

न्या. एन. के. वाळके : सिहोऱ्यात बालिका दिनाचे आयोजन

चुल्हाड (सिहोरा) :- ग्रामीण भागातही घराघरात शिक्षणाचा प्रचार होत आहे. गावातील मुलीही उच्च शिक्षणासाठी शहरात धाव घेत आहेत. ग्रामीण भागात सोयीसुविधा पोहचल्याने शक्य झाले असले तरी मुलींनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एन. के. वाळके यांनी केले.

सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित बालिका दिन व राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उदघाटन तुमसरचे दिवाणी न्यायाधीश आनंद वाय. बोरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एन . के. वाळके होते. यावेळी खंडविकास अधिकारी डी. बी. पाटील, महिला व बाल कल्याण अधिकारी नंदागवली, परसमोडे, कृषी अधिकारी एस. बी. न्यायमूर्ती, सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेद्र तुरकर उपस्थित होते. शासकीय योजनाची माहिती गटविकास अधिकारी पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचे आर्थिक विकास व शेतीत उत्पादन वाढ करण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांविषयी कृषी अधिकारी न्यायमूर्ती यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणसंदर्भात माहिती दिवाणी न्यायाधीश आनंद बोरकर यांनी माहिती दिली आहे. बालिका दिन व राष्ट्रीय मतदान दिनाचे विषयावर मोलाचे मार्गदर्शन एन. के. वाळके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एस. एम. टेभरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्य ओ. बी. गायधने यांनी केले. कार्यक्रमाला पंचभाई, एन. एल. गडदे, देशमुख, गभने, तुरकर, शरणागत, बनकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Girls should be self-reliant