शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात धानाचे चुकारे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर आतापर्यंत दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदीची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे २८ कोटी प्राप्त झाले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे. २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी तात्काळ मिळवून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देनाना पटोले : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले धान चुकारे येत्या आठ दिवसात करण्याचे निर्देश देत आरोग्य, शिक्षण, सिंचन पाणी, गोसेखुर्द पुनर्वसन व रोजगाराच्या रोजगार या विषयांचा आराखडा तयार करुन तात्काळ अमंलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आदी उपस्थित होते.भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर आतापर्यंत दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदीची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे २८ कोटी प्राप्त झाले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे. २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी तात्काळ मिळवून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. धानाची भरडाई करण्यासाठी तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात धान खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी आमदार राजू कारेमोरे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली असता केंद्र वाढविण्याची तात्काळ सूचना त्यांनी दिली.आरोग्य, शिक्षण व सिंचन हे विषय प्राधान्याचे आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अद्यावत ठेवण्याची त्यांनी सांगितले. यावर्षी पाण्याची टंचाई जाणवणार नसली तरी पुढील २५ वर्षासाठी पिण्याचे पाणी व सिचंनाचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहात पक्षपात करणार नाहीविधानसभा अध्यक्षाचे पद संवैधानिक असून या पदाची प्रतिष्ठा कायम राखण्याचा आपण प्रयत्न करू सभागृहात आपण पक्षपात न करता जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.विधानसभा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली असून भंडारा जिल्ह्याच्या लौकीकात कमीपणा येईल असे कोणतेही कृत्य आपण करणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून त्यामाध्यमातून मागासलेल्या विदर्भाचे प्रश्न सोडविले जातील, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागतविधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांचे गुरुवारी जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले. त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. चिखली, जवाहरनगर, शहापूर, मुजबी, बेला, नागपूर नाका यासह भंडारा शहरातील विश्रामगृह आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. कारधा, लाखनी आणि साकोली येथे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले