शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

महिलानो, चूल आणि मूलच्या चौकटीतून बाहेर या

By admin | Updated: March 23, 2016 00:49 IST

ग्रामीण भागातील बहुतांशी महिला ह्या चुल आणि मुल या चौकटीतच जीवनमान जगत आहेत.

माधुरी हुकरे यांचे आवाहन : दिघोरी येथे महिला व बाल मेळावादिघोरी/ मोठी : ग्रामीण भागातील बहुतांशी महिला ह्या चुल आणि मुल या चौकटीतच जीवनमान जगत आहेत. महिलांनी पुरुषाचे बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कामे करावीत यासाठी शासनाने महिलांना प्रत्येक क्षेत्रासाठी आरक्षीत जागेची व्यवस्था केली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलंना सुध्दा आपले कर्तुत्व सिध्द करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोन करण हे आता तुमच्या हातात आहे. त्यासाठी ‘चुल आणि मुल’ या चौकटीच्या बाहेर या व आपले कर्तृत्व जगाला दाखवून दया असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी/मोठी येथील नगर तैलीक समाज संस्थेच्या आवारात आयोजित महिला व बाल मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच शंकरराव खराबे, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, सचिव टी. एम. कोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कैकाडे, हिराताई करंजेकार, जासवन नंदेश्वर, हेमराज शहारे, सिंधुबाई रामटेके, मार्कंड हुकरे, संगीता हटकर, सुमित्रा घुबडे, ओम करंजेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी एन. डब्ल्यू. वैतागे, पर्यवेक्षक बालविकास प्रकल्प दिघोरी एच.आर. रहांगडाले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. कैकाडे यांनी माता व बाळांच्या आहाराबद्दल माहिती दिली. तसचे कुपोषण टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या शिवाय लसीकर व शासनाच्या माता व बाळांसाठी असलेल्या शासकिय योजनांची माहिती दिली.यावेळी दोन मुलींवर कुटूंब कल्याण योजनेचा लाभ घेणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी एन. डब्ल्यू. वैतागे यांनी विविध योजनांची माहिती दिली. आंगणवाडी सेविकांनी समुह गीत साजरे केले व त्यामाध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाअगोदर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच अंगणवाडी सेविकांनी पोषकतत्वे असलेली पदार्थ बनवून स्टॉल लावला व कसे तयार करायचे व यापासून कोणते पोषकतत्वे मिळतात याबाबत माहिती दिली. संचालन प्राचार्य एन. गायधने यांनी केले. (वार्ताहर)