बेला येथे इंधन संरक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:51+5:302021-02-05T08:40:51+5:30

भंडारा : तालुक्यातील बेला येथील महेंद्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एलपीजी इंधन संरक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम एमपीसीएल अंतर्गत पीसीआरए ...

Fuel Conservation Program at Bella | बेला येथे इंधन संरक्षण कार्यक्रम

बेला येथे इंधन संरक्षण कार्यक्रम

भंडारा : तालुक्यातील बेला येथील महेंद्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एलपीजी इंधन संरक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम एमपीसीएल अंतर्गत पीसीआरए सक्षम २०२१ तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला कंपनीचे मुख्य प्रबंधक नितिन सहारे, दिनेश जनबंधू उपस्थित होते. सदर कार्यक्रम भंडारा येथील कोचे गॅस सर्विस आणि भंडारा गॅस सर्विसद्वारा सक्षम २०२१ आयोजित करण्यात आला होता. दिनेश जनबंधू यानि विद्यार्थ्यांना गॅस वापर करताना कशी काळजी घायची, हे संगितले. सिलिंडर घरी आल्यावर त्याचे सील कसे तपासावे, याची माहिती देण्यात आली. गॅस कसा वाचविता येऊ शकतो, पसरट भांड्याचा अधिक वापर करावा, प्रेशर कुकरचा नेहमी वापर करावा आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राचार्य गेडाम, यांच्यासह इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.

area

Web Title: Fuel Conservation Program at Bella