शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.

ठळक मुद्देजलाशय तुडूंब : अवकाळीचा शेतीला फटका, मात्र सिंचन प्रकल्पाच्या साठ्यात वाढ

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानीचा ठरत असला तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी संजीवनी ठरत आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सदर जलाशय तुडूंब भरल्याने परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.१ जानेवारीपासून प्रकल्प स्थळातील पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने हा जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलाशय तुडूंब भरत असताना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पर्यटकांना वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी जलपातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे.जलसाठ्याचे नियोजन गरजेचेउन्हाळ्यात पाणीटंचाईचे चित्र राहत असल्याने जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी अवकाळी पावसाने प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत दोन महिने नदीपात्रात पाणी होते, परंतु विजेचे ब्रेकडाऊन असल्याने पंपगृह सुरु करण्यात आले नव्हते. १ जानेवारीपासून प्रकल्पस्थळात पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. ३६ फुट पाणी साठवण करण्याची क्षमता असणाºया चांदपूर जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असण्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात