शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:24 IST

गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली.

अनर्थ टळला : आंबागड किल्ला परिसरातही आगीने वनसंपदा स्वाहा तुमसर : गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. वणवा पेटलेल्या जागेपासून १० ते १२ फूट अंतरावर चारचाकी वाहनतळ होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती.गायमुख येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. सातपुडा पर्वत रांगात हे यात्रा स्थळ आहे. दीड ते दोन लाख भाविक यात्रेनिमित्त येतात. शुक्रवारी रात्री लोहारा मार्गावरील या जंगलात आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीनंतर वाहनधारकांनी वाहने तिथून हलविले. अन्यथा अनर्थ घडला असता. मोहाडी तालुक्यातील गायमुख यात्रास्थळी तुमसर, मोहाडी तालुक्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. आग कुणी लावली याची माहिती कुणालाही नाही. आगीचे लोळ दिसल्याने एकच धावपळ उडाली. परतीच्या मार्गावर ही आग असल्याने भाविकांनी काढता पाय घेतला. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलातील झाडांची पाने गळून पडल्याने पालापाचोळा व गवत सध्या वाळलेले आहे. त्यामुळे आग जंगल परिसरात लवकर पसरते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला भाविकांचे जत्थे होते. त्यांच्यात भीतीचे सावट पसरले होते. (तालुका प्रतिनिधी) गायमुख यात्रा परिसरात अंधारविदर्भात लहान महादेव म्हणून गायमुख प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात विजेची सोय आहे. मंदिर प्रवेशद्वारानंतर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. आंबागड तथा लोहारा रस्त्याशेजारी भाविकांचे जत्थे होते. त्यांनी शेतात आश्रय घेतला होता. लोहारा रस्त्यावर कुठेही प्रकाश व्यवस्था नाही. प्रशासनाने यात्रेनिमित्त विजेची व्यवस्था करणे गरजेचे होते. पुरूष भाविकांसोबत महिला भाविकांची संख्या मोठी होती. रात्री हा परिसर काळोखात असतो. महिला भाविक येथे सुरक्षित राहू शकत नाही.आंबागड किल्ल्याजवळ आगशुक्रवारी आंबागड किल्ल्याला आग लागल्यची वार्ता पसरली. किल्ल्याजवळ काही मजुरांनी आग लावली होती. ही आग किल्ल्याच्या पायथ्याशी लागली होती. तेंदूपत्ता व मोहफूल गोळा करण्याकरिता ही आग लावण्यात आल्याची माहिती आहे. नंतर मजुरांनीच ही आग विझविल्याची माहिती आहे. ऐतिहासिक गड किल्ल्याजवळ आगीच्या घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.