शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:37 IST

शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देतुमसर येथील घटना : १० लाखांचे नुकसान, उलटसुलट चर्चेला पेव

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले. ही आग लावली की लावण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार झाली नव्हती.यासंबंधी आरोग्य निरीक्षक जगदीश ठाकरे यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. यावरून डंपींग यार्डमधील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आज अचानक सकाळचा कचरा घेऊन गेलेला कंटेनर डम्पिंग यार्डला गेले असता त्याला आगीचे धूर निघताना दिसले. त्यानंतर त्यांनी आरोग्य निरीक्षक जगदीश ठाकरे यांना माहिती दिली. त्यांनी अग्नीशमन दलाला माहिती देऊन घटनास्थळ सांगितले. अग्नीशमन दलाने आग विझविली. अन्यथा ती आग दुसऱ्या इमारतीला ल ा गली असती. डंपींग यार्डच्या बाजूला असलेल्या शेतात धानाचे पुंजणे ठेवलेले आहे. ती आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीमुळे डंपींग यार्डच्या इमारतीला भेगा पडल्या आहेत. या डंपींग यार्डमध्ये शहरातील घनकचरा जमा केला जातो. या इमारतीत प्लास्कीटची पोती, खतनिर्मितीसाठी ठेवण्यात आली होती. ती पोती पूर्णत: खाक झाली. कचºयाचे कंत्राट शारदा महिला बचत गट हिवरा यांना आहे. आगीचे रहस्य काय या बाबीचा संभ्रम आहे.चौकशी होणे गरजेचेडम्पिंग यॉर्डला लागलेल्या आगीत जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. डम्पींग यॉर्ड गावाबाहेर असल्याने येथे येणाºया जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प असते. कंटेनर कचरा घेवून गेलेल्या कर्मचाऱ्याला ही आग दिसली असली तरी ही आग कुणी लावली असावी, हे मात्र एक कोडेच आहे. आगीची चौकशी केल्यास सत्यता सामोर येवू शकते. नगर पालिका प्रशासनाने याविषयी सविस्तर चौकशी समिती गठित करून प्रकरणाचा उलगडा करण्याची गरज आहे. ऐन हिवाळ्यात ही आग लागणे म्हणजे काही तरी काळबेर असल्याचा संशय निर्माण होतो. आगीच्या सुरक्षेसाठी येथे कोणतीही उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. कंटेनर वाहकाच्या निदर्शनात आल्यामुळे परिसरात असलेल्या धानाचे पुंजणे जळता जळता बचावले. अन्यथा आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांवर संकट ओढावले असते. डम्पींग यॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक जमा करण्यात आले होते. जप्तीच्या कारवाईतील ही प्लॉस्टिक असल्याची चर्चा तुमसर शहरात आहे. या आगीच्या चौकशीसाठी जिल्हाकाऱ्यांनी पुढाकार घेवून तोडगा काढण्याची गरज आहे.

टॅग्स :fireआगdumpingकचरा