शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सायकल दुकानाला आग लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत ...

अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. बाहेरून अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत सायकल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस झाला. वादळामुळे शहरातील वीज बंद होती. स्थानिक अर्बन बँकेनजीक राजेश सायकल स्टोअर आहे. या दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचे कुणीतरी बघितले. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. शहरातील सेवाभावी मंडळींनी आग विझविण्याचा बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बऱ्याच सायकली व इतर साहित्य जळून खाक झाले होते. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. शहरात व तालुक्याच्या इतर गावांत आगीच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नाही. मागील काळात अग्निशमन वाहन खरेदीचा नगरपंचायतीने प्रस्ताव तयार केला होता. नंतर कुठे घोडे अडले कुणास ठाऊक? तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन वाहन नसणे ही दुर्दैवी बाब आहे. ही सुविधा असती, तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून झालेले नुकसान टाळता येऊ शकले असते.