शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

७१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

By admin | Updated: August 22, 2016 00:28 IST

तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरिता रविवारी मतदान पार पडले.

आज मतमोजणी : तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तुमसर : तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरिता रविवारी मतदान पार पडले. ७१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ मतदान केंद्र होते. येथे एकूण मतदारांची संख्या ३,७६२ होती. ९६ टक्के मतदान झाले. तुमसरात शकुंतला सभागृहात सोमवारला सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरु होणार आहे. तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षानंतर घेण्यात आली. दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र तथा राज्यात तांदळाची मोठी ही बाजारपेठ आहे. कोट्यवधीची येथे उलाढाल आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी येथे मोर्चेबांधणी केली होती. आज, रविवार रोजी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी होती. मतदारांत प्रचंड उत्साह होता. तुमसर तालुक्यात तुमसर शहर, नाकाडोंगरी, लेंडेझरी, बिनाखी, सिहोरा, मिटेवानी तर मोहाडी तालुक्यात मोहाडी, हरदोली/झं., करडी, कांद्री, आंधळगाव येथे मतदान केंद्र होते. १९ संचालक पदाकरिता सेवा सहकारी गटज्ञतून ११, मापारी/हमाल १, ग्रामपंचायत ४, पणन/प्रक्रिया १, अडत्या/व्यापारी २ संचालकांचा समावेश आहे. या निवडणूकीत तीन आघाड्या तयार केल्या होत्या. या आघाड्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राकां पक्षातील नेत्यांचा समावेश होता. निवडणूक निकालानंतर येथे चित्र स्पष्ट होईल. तिनही आघाड्यात काट्याची टक्कर वर्तविण्यात येत आहे. मागील दीड महिन्यापासून उमेदवार व त्यांचे समर्थकांनी प्रचाराकरिता परिश्रम घेतले. विजयाची खात्री येथे सर्वानीच वर्तविली. पंरतू प्रत्यक्ष निकालानंतर ते कळेल. सभापती पदाकरिता येथे जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)