शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना समजले नसल्याने सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, परंतु ही समस्या सुटण्यापूर्वीच नवीन समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. एकीकडे  सरकारने ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला धान केंद्रावर विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आणि त्याची शेवटची तारीखही ३० सप्टेंबर दिली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : महाराष्ट्र सरकारने सन २०२१-२२ करिता ई-पीक पाहणी ॲपद्वारे करण्याची नवीन पद्धत अंमलात आणली आहे. ही पद्धत शेतकऱ्यांना समजण्यासारखी नसून, ती सर्व माहिती भरत असताना शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी नेटवर्क समस्या, कधी जिओ ट्रॅकिंग समस्या, कधी छायाचित्र काढत असतानाची समस्या, अशा विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यात आता मुदत संपत असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना समजले नसल्याने सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, परंतु ही समस्या सुटण्यापूर्वीच नवीन समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. एकीकडे  सरकारने ई-पीक पाहणी नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला धान केंद्रावर विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आणि त्याची शेवटची तारीखही ३० सप्टेंबर दिली आहे.  एवढ्या कमी वेळेत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अपलोड करून, सातबारा हातात घेऊन धान खरेदी  केंद्रावर सातबारा पोहोच करणे शक्य होईल का, त्यातच तलाठी कार्यालयातील शेतकऱ्यांची गर्दी ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत असते. तलाठी कार्यालयातील उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या रांगा पाहता, सातबारा मिळण्यासाठी २-३ दिवस तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात व त्यानंतर सातबारा हातात मिळतो. 

मुदतवाढ देण्याची मागणी - नंतर धान खरेदी केंद्रावर नंबर लावण्याकरिता पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसभर उभे राहून आपला नंबर लावावा लागतो, तरीही सर्व प्रक्रिया ३० सप्टेंबरच्या पूर्वी होईल का, या विचाराने सर्व शेतकरी चिंतेत पडले आहेत. या सर्वांचे मूळ कारण शासनाने सुरू केलेली ऑनलाइन प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या लक्षात घेता, धान खरेदी केंद्रावर सातबारा ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भारतीय जनता युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास बागडकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :onlineऑनलाइनagricultureशेती