हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By Admin | Updated: February 24, 2016 00:38 IST2016-02-24T00:38:49+5:302016-02-24T00:38:49+5:30

तालुक्यातील काही गावे चौरास भागात मोडत असल्याने येथे विविध प्रकारची पिके घेतली जातात.

Farmers' move to turmeric cultivation | हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

आसगाव (चौ.): तालुक्यातील काही गावे चौरास भागात मोडत असल्याने येथे विविध प्रकारची पिके घेतली जातात. येथे ऊस पिकासोबत भाजीपालावर्गीय पिकासोबत हळदपिकाचे सुध्दा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातच बहुतेक उत्पादनापेक्षा हळदीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे.
पवनी तालुक्यामध्ये सुमारे ४०० एकरामध्ये संध्या हळदीचे उत्पादन घेतले जात आहे. तालुक्यातील भेंडाळा, खैरी, जुनोना, वडेगाव, मोखारा, सिंदपुरी आदी गावांमधील शेतकरी हळद उत्पादन घेतात. हळदीची लागवड साधारणत: जुलै महिन्यामध्ये केली जात असून सध्या काळणीचा हंगाम सुरु आहे. याची लागवड वाफे पध्दतीने केली जात असून वायगाव वाणाची लागवड अधिक असून सेलम व कृष्णा प्रजातीच्या वाणाची लागवड अल्प प्रमाणात असते. लागवडीची पध्दत साधारण असून ४ बाय १० च्या १ फुट उंच गादीवाफयावर लागवड करावी लागते. हळदीची काढणी झाल्यानंतर त्याला वाळत घालावी लागते. त्यानंतर ड्रममध्ये घालून त्यांना उकळावो लागते.
उकळून झाल्यानंतर तीला सूर्यप्रकाशात वाळत घालावी लागते. वाळल्यानंतर ढोल्याच्या सहाय्याने घुसळावे लागते. हळद विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी कष्टाचे काम आहे. एका एकरामध्ये सुमारे १० क्विंटल हळदीचे उत्पादन अपेक्षीत आहे. सध्याचे बाजारभाव १० हजार रुपये क्विंटल असून त्यात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers' move to turmeric cultivation