शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रेती तस्करीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त्यात ट्रॅक्टर विना नंबरचे आहेत. या वाहनांनी अपघात झाल्यास तर तक्रार कशी करावी हा कायदेशिर प्रश्न उपस्थित होतो.

ठळक मुद्देभावही गगनाला : कोट्यवधींचा महसूल पाण्यात, पथकांवर हल्ल्याच्या घटनातही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला वरदान लाभलेल्या वैनगंगा नदी पात्रातील रेतीच्या तस्करीला उधाण आले आहे. महसूल प्रशासनासह खनिकर्म विभागाचे दुर्लक्षाने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. परिणामी एकीकडे कोट्यवधींचा महसूल बुडत असून तस्करांची मात्र भरभराट झाली आहे.जिल्ह्याची जीवनदायीनी नदी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा तिच्या उपनद्यांमध्ये वारेमाप रेतीचे खणन केले जाते. जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त रेतीघाट असून लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र बांधकाम व्यवसायीकांसह कंत्राटदारांना रेतीचा पुरवठा मात्र सुरू आहे. या व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होत असून रेतीचे भावही गगनाला भिडले आहेत.पावसाळा संपताच इमारत बांधकामाला जोमाने प्रारंभ झाला आहे. परिणामी बांधकाम साहित्यांची मागणीही वाढली आहे. याचाच फायदा रेती तस्कर खुलेआम उचलत आहेत.वेळप्रसंगी रेतीची वाहतूक करताना अडथळा आणणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यातही रेती तस्कर मागेपुढे पाहत नाही.रेती तस्करांची मुजोरी वाढली असून सर्वच विभागांच्या अक्षम्य दुर्लक्षपणाचा फटका जिल्ह्यातील गौण खनिजांना बसत असून खुलेआम लुट सुरू आहे.विनानंबरच्या ट्रॉलीतून रेतीची वाहतूकपवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त्यात ट्रॅक्टर विना नंबरचे आहेत. या वाहनांनी अपघात झाल्यास तर तक्रार कशी करावी हा कायदेशिर प्रश्न उपस्थित होतो. विनानंबर प्लेटची वाहने तेही रेती वाहतुकीसाठी वापरली जात असताना परिवहन विभाग, पोलीस व महसूल प्रशासन कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. याचा अर्थ प्रशासनाच्या आशिर्वाद रेती तस्करीला आहे काय, असा प्रश्नही नागरिकांसमोर उपस्थित होतो.

टॅग्स :sandवाळू