बेरोजगारांना मिळाले ‘रोजगारी’चे बळ

By Admin | Updated: September 21, 2016 00:33 IST2016-09-21T00:33:48+5:302016-09-21T00:33:48+5:30

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नसल्याने बेरोजगारांची फौज तयार होत आहे. अशा होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे ...

Employment unemployed got 'employment' strength | बेरोजगारांना मिळाले ‘रोजगारी’चे बळ

बेरोजगारांना मिळाले ‘रोजगारी’चे बळ

५५० लाभार्थी : कौशल्य विकास कार्यक्रम
भंडारा : सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नसल्याने बेरोजगारांची फौज तयार होत आहे. अशा होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत आज भंडारा पंचायत समिती सभागृहात बेरोजगार मेळावा घेण्यात आला. यात ५१० युवकांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांना एका नव्या उमेदीचे बळ मिळाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत भंडारा पंचायत समितीच्या सहकार्यातून हा बेरोजगार मेळावा घेण्यात आला. पंचायत समिती सभागृहात आयोजित या मेळाव्याला ग्रामीण तथा शहरी भागातील युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यात ५१० युवक युवतींची नोंदणी करण्यात आली. या मेळाव्याला पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, संवर्ग विकास अधिकारी मंजुषा ठवकर, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तालुका समन्वयक माधुरी पांढरे, प्रशांत बिलवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरोजीनी खोब्रागडे, गौतम कहाळे, गौतम पाटील, प्रदीप दांडगे, स्वाती तिवारी, विस्तार अधिकारी अतुल वर्मा आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून या कार्यशाळेच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करावी व स्वत:ला स्वयंसिद्ध करावे असे आवाहन करण्यात आले.
मुलाखती झाल्यानंतर नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येईल. यावेळी शासन एका विद्यार्थ्यावर सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च करणार आहे. दरम्यान तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यात त्यांना कमीत कमी सहा हजार रुपये मानधन मिळेल. अशा या मेळाव्याने उपस्थित बेरोजगारांना खरोखरच रोजगाराची एक नवे दालन उघडण्याची प्रतिक्रिया युवक - युवतींनी यावेळी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Employment unemployed got 'employment' strength