शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतबांधावर लाकडी खांबाद्वारे वीज पुरवठा

By admin | Updated: April 16, 2016 00:25 IST

महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यात लाकडांच्या खांबावरून वीजपुरवठा देण्यात आला.

चार वर्षांपासून सिमेंट खांबाची प्रतीक्षा : महावितरण आपल्या दारीमुळे अपघाताची शक्यतामोहन भोयर तुमसरमहावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यात लाकडांच्या खांबावरून वीजपुरवठा देण्यात आला. सध्या या खांबाचे आयुष्य संपलेले आहे. सिमेंट खांबाहून विद्युत पुरवठा करणे येथे गरजेचे आहे. जीवंत विद्युत तारांमुळे शेकडो शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.मागील चार वर्षापूर्वी महावितरण कंपनीने महावितरण आपल्या दारी ही योजना शेतकऱ्यांकरिता सुरू केली होती. मागेल त्याला वीज असे हे ब्रिदवाक्य होते. भंडारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे २४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज पुरवठा करण्यात आला. ३ एच.पी. व ५ एच.पी.चा वीज पुरवठा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत करण्यात आला. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर त्यांना वीज पुरवठा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत लाकडी खांबावर वीज तारा येथे ओढण्यात आला. पुढे सिमेंट खांब लावण्यात येतील, अशी ही योजना होती. शेतीतील लाकडी खांब शेतीच्या धुऱ्यावर गाडण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे अनेक खांब खालून सडलेल्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात वादळी सुसाट वारा घोंगावतो. या वाऱ्यात ही लाकडी खांब टिकाव धरू शकणार नाही. तांत्रिक सुविधांमुळे अपघाताची शक्यता नसली तरी त्याची हमी मात्र कुणीच देवू शकत नाही. भंडारा जिल्ह्यात ४४५ कि़मी. वीज तारा शेतीपर्यंत वाहून नेण्याकरीता सिमेंट खांबाला सुमारे १४ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर माहिती मागितली असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.तुमसर तालुक्यात अशा लाकडी खांबाची संख्या मोठी आहे. महावितरणने तात्काळ सिमेंट खांब लावण्याची गरज आहे. सदर खांब अपघाताला नक्कीच आमंत्रण देणारे आहेत.-विजय राणे, तालुका प्रमुख युवा सेना, तुमसर.मागील चार वर्षापासून लाकडी खांबावर शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महावितरणने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा याकरिता आंदोलन करण्यात येईल.- के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.लाकडी खांब बदलवून सिमेंट खांब लावण्याकरिता १४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात आला. लवकरच कारवाई होईल.-ए.के. गेडाम, कार्यकारी अभियंता प्रशासन महावितरण, भंडारा.