शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:02 IST

जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर पुन्हा संकट : मोका चौकशी करून मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जिल्ह्यात दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच रविवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर यासह मोहाडी, तुमसर तालुक्यातील सकाही भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे धानासह रबी पिकाला चांगलाच फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. भंडारा शहरात सकाळी ९ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली.पवनी : मागील काही दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने सुर्याचे दर्शन झाले नाही. पवनी शहरात पाऊस बरसला नाही. धानाची मळणी काहींची झाली, काहींची व्हायला आहे. अशा वातावरणात रब्बी हंगामातील पिकावर अळी पडते असा शेतकऱ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक म्हणून हरभरा, वाटाणा, गहू, ज्वारी, मुग, उडीद, मटकी, लाख-लाखोरी, जवस, मिरची, कोथिंबीर व भाजीपाला अशी पीकं घेतली जातात. अशा सर्व पिकांचे अळी पडल्याने नुकसान होत असते. सकाळ पासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी वर्गाला चिंता सतावत आहे.साकोली : मागील दोन तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून कडाक्याची थंडी आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस आला. याचा फरक आज आठवडी बाजारावर पडला आहे. शेतात कठाण माल असून या पावसाचा तेवढा परिणाम पडला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे नक्कीच फरक पडणार आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकºयांचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. जर जोराचा पाऊस आला तर धान नसविण्याची होण्याची शक्यता आहे.जवाहरनगर : सतत तीन दिवसापासून जवाहरनगर व इतर परिसरात ढगाळ वातावरण होते. सूर्याचे दर्शनही झाले नाही. आज सकाळी ८.३० वाजता सुमारापासून ११ वाजतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांचे शेतावर कापलेले धान पिकास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालांदूर : दहा दिवसांपासून ढगाळ हवामानाने मानवी जीवनासह बागायती कडधान्याची शेती प्रभावित झाली आहे. रविवार सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून आले. मोठा पाऊस येणार अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली. मात्र परिसरात तुतळक पावसाची हजेरी लागली. तुळीच्या शेंगा पोखरणारे पोषक हवामान असल्याने तूर पीकाचे नुकसान झाले आहे. उघड्यावर धान खरेदी केंद्रावर धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मिळेल ती साधने वापरीत धान झाकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मोठा पाऊस आल्याशिवाय आभाळ खुलणार नाही, असे जाणकारांचे म्हणने आहे.

टॅग्स :Rainपाऊस