शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

अकाऊंटंटवर विसंबून राहू नये

By admin | Updated: July 2, 2014 23:13 IST

शासनाकडे जमा होणाऱ्या एकूण करापैकी ५० टक्के कर हा टी.डी.एस. कपातीतून जमा होतो. ज्यामध्ये आयकर, वस्तू व सेवा पुरवठादारांवरील कर, वन उत्पादने, मद्य यावरील कराचा समावेश आहे.

टीडीएस कार्यशाळा : सतीश गोयल यांचे प्रतिपादनभंडारा : शासनाकडे जमा होणाऱ्या एकूण करापैकी ५० टक्के कर हा टी.डी.एस. कपातीतून जमा होतो. ज्यामध्ये आयकर, वस्तू व सेवा पुरवठादारांवरील कर, वन उत्पादने, मद्य यावरील कराचा समावेश आहे. ही कर कपात कशी करायची, त्याचे नियम, फायदे-तोटे, न केल्यास शिक्षा इत्यादी बाबीची माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी. केवळ चार्टर्ड अकाऊंटंटवर विसंबून न राहता अधिकाऱ्यांनी याकडे जबाबदारीने लक्ष द्यावे, असे आवाहन आयकर आयुक्त सतीश गोयल यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयकर विभाग नागपूर आणि भंडारा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी ेटी.डी.एस. या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्ष स्थानावरुन गोयल बोलत होते.याप्रसंगी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी. रविकुमार, सहआयुक्त श्रमदीप सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, नागपूर रेंज १ चे आयकर अधिकारी पंकज देशमुख, जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकारी केदार, जिल्हा कोषागार अधिकारी अतुल गायकवाड उपस्थित होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आयकर हा विषय अवघड असला तरी प्रत्येकाने तो समजून घेतला पाहिजे. आज आयकर आयुक्तांनी हा सेमीनार येथे आयोजित करुन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना विषय समजून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.नागपूर रेंज १ चे आयकर अधिकारी पंकज देशमुख यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टी.डी.एस. संदर्भातील माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. ते म्हणाले, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आयकर कपात करणे तसेच शासनाला वस्तु व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांकडून टी.डी.एस. कपात करणे आवश्यक आहे. कपात केल्यानंतर अधिकारी जी माहिती देतील त्या आधारावर तो टीडीएस रिटर्न आॅनलाईन भरतो. टी.डी.एस. रिटर्न भरताना पॅन नंबर, टॅन क्रमांक चुकीचा देणे, पिन क्रमांक चुकीचा दिल्यामुळे त्यामध्ये त्रुट्या निर्माण होतात. त्रुट्या झाल्या तर आयकर विभाग गाझियाबाद येथून पत्र येतात. झालेल्या चुकीची दुरुस्तीसाठी पुन्हा अधिकाऱ्यांचा वेळ व पैसा वाया जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक संजय अपुरकर यांनी केले. संचालन कसबेकर यांनी केले तर मटलानी यांनी आभार मानले.(नगर प्रतिनिधी)