शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना शिस्तभंगाची नोटीस

By admin | Updated: June 12, 2017 00:26 IST

आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून भंडारा येथील ११७ बदल्या रद्द केल्या होत्या.

प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : आज सीर्इंओकडे अहवालप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून भंडारा येथील ११७ बदल्या रद्द केल्या होत्या. यात अनियमितता करणाऱ्यांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांचा सहभाग असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या अनुषंगाने आयुक्त अनुपकुमार यांनी नोटीस बजावली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत ‘लोकमत’ने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील अनियमितेबाबत वृत्तमालिका चालविली होती. या बदली प्रक्रियेची दखल घेऊन आयुक्त अनुपकुमार यांनी दोषी आढळलेल्या पाच जणांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथ.) अभयसिंग परिहार, कक्षाधिकारी नलिनी डोंगरे, अधिक्षक रामभाऊ तरोणे, वरिष्ठ सहायक सुरेश येवले, वरिष्ठ सहायक तथा जि.प. उपाध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक मनिष वहाणे यांचा समावेश आहे. जि.प. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. यात त्यांनी ११७ बदल्या केल्या. बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आला असून बदलीचे निकष डावलण्यात आल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला होता. याची दखल घेत आयुक्त अनुपकुमार यांनी याची समितीमार्फत चौकशी केली. यात अनियमितता झाल्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला. आयुक्तांनी जिल्हा परिषदमधील ११७ पैकी न्यायालयात दाद मागणाऱ्या ६ शिक्षकांना वगळून अन्य ११६ बदल्या रद्द केल्या होत्या. आयुक्तांचे शिस्तभंग नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. आयुक्तांच्या नोटीसबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी शिक्षण विभागाला तात्काळ अहवाल मागितला आहे. दुसरा शनिवार व रविवार हे सुटीचे दिवस असतानाही उपशिक्षणाधिकारी चोले यांनी कार्यालयात बसून अहवाल तयार केल्याचे समजते. सीईओ यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचा अहवाल सोमवारी सादर करण्यात येत असून बदली प्रक्रियेत दोषी आढळून आलेल्या पाच जणांवर काय कारवाई करतात याकडे नजरा लागल्या आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पाच जणांना दोषी पकडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येईल.- मोहन चोले, उप शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.