जिल्ह्यात १९ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST2021-02-08T04:31:00+5:302021-02-08T04:31:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे बरे झालेल्या ...

Discharge of 19 patients in the district | जिल्ह्यात १९ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात १९ रुग्णांना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ८५६ झाली आहे. रविवारी पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ३०७ झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे.

रविवारी २८२ व्यक्तिंच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख २० हजार ९९२ व्यक्तिंच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात १३,३०७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील ४, लाखनीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १२ हजार ८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या १२७ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३२४ झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के असून, जिल्ह्याचा मृत्यूदर ०२.४१ टक्के एवढा आहे.

शासकीय व खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णाची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Discharge of 19 patients in the district