शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीचे पात्र झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवारातून वाहणारी बावनथडी सध्या कोरडी पडली आहे. येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. संपूर्ण बावनथडी नदी पात्राचे रुपांतर वाळवंटात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची चाहूल : बेसुमार रेती उपशाचा परिणाम, पात्रात झुडुपी वनस्पती

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्याची जीवनदायीनी बावनथडी नदी एप्रिल महिन्यात कोरडी पडली आहे. विस्तीर्ण नदी पात्रामुळे एखाद्या वाळवंटासारखी दिसत आहे. नदीपात्रात झुडुपी वनस्पती, कुठे माती तर तुरळक रेतीचा साठा आहे. नदीकाठावरील सुमारे ४० ते ४२ गावात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भूगर्भातील पाणी पातळीही येथे खोलवर गेली आहे.मध्यप्रदेशात उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नागरिकांची तृष्णा व शेतकऱ्यांकरीता वरदान ठरली आहे. बावनथडी नदीवर दोन राज्यांनी मिळून सीतेकसा येथे धरण बांधले आहे. त्यामुळे बावनथडी नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडत आहे. नाकाडोंगरी शिवारातून वाहणारी बावनथडी सध्या कोरडी पडली आहे. येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. संपूर्ण बावनथडी नदी पात्राचे रुपांतर वाळवंटात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक गावांच्या नळयोजना शेवटची घटका मोजत आहेत. मागील पाच ते सहा वर्षापासून नदी पात्र येथे कोरडे पडत आहे. धरण बांधकाम हे महत्वपूर्ण व शास्त्रीय कारण प्रमुख असले तरी बेसुमार रेती उपसा त्याला दुसरे कारण येथे आहे.पदी पत्रात पाणी रोखून ठेवण्याकरिता रेतीची मोठी गरज असते. मात्र येथील नदीपात्रात रेतीच आता दिसत नाही.पाणी टंचाई निर्माण होणारबावनथडी नदी काठावरील सुमारे ४५ ते ५० गावात यंदा तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. त्याकरिता बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची गरज भासरणार आहे. मागील तीन ते चार वर्षापासून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी