घरकूल योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:15+5:30

घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलली रक्कम १ लाख ३० हजार रूपये असून मनरेगा अंतर्गत मजुरी १८ हजार २७० रूपये, असे एकूण १ लाख ४८ हजार २७० रूपये प्राप्त होतात. सदर अनुदानातून लोखंड, सिमेंट, विटा इत्यादी साहित्याचा खर्च करावा लागतो. सदर साहित्याचा दर वाढल्याने या तुटपुंज्या रक्कमेमधून लाभार्थी आवास योजनेचे काम पूर्ण होत नसल्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत येवून कर्जबाजारी होत आहेत.

Demand for increase in housing loan amount | घरकूल योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी

घरकूल योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी

ठळक मुद्देपंकज श्यामकुंवर : जुन्या घरकुलाला वाढीव अनुदान द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : केंद्र व राज्य शासनाची घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री, रमाई आणि शबरी आवास योजनेतून मिळत असलेल्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलली रक्कम १ लाख ३० हजार रूपये असून मनरेगा अंतर्गत मजुरी १८ हजार २७० रूपये, असे एकूण १ लाख ४८ हजार २७० रूपये प्राप्त होतात. सदर अनुदानातून लोखंड, सिमेंट, विटा इत्यादी साहित्याचा खर्च करावा लागतो. सदर साहित्याचा दर वाढल्याने या तुटपुंज्या रक्कमेमधून लाभार्थी आवास योजनेचे काम पूर्ण होत नसल्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत येवून कर्जबाजारी होत आहेत. सन १९९८ ते २००८ पर्यंत ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला होता. ती घरकुले जीर्ण होवून पडलेली आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना नवीन घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना देखील तीनही आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी पंकज श्यामकुंवर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

Web Title: Demand for increase in housing loan amount