शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांना आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील अनेक शाळांची आरटीई अंतर्गत प्रतिपूर्ती २०१७ पासून थकीत आहे. लॉकडाऊनमुळे शाळेला पैशाच्या स्वरूपात येणारी फी बुडाल्याने शाळांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. फीच्या स्वरूपात मिळणारे पैसे येणे बंद झाल्याने अनेक शाळांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देमेस्टाचे निवेदन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा

सरसकट प्रतिपूर्ती द्या
शिक्षण हक्क कायद्यानुसार संबंधित शाळांना प्रतिपूर्ती देण्याचा नियम आहे. पण नियमानुसार ठराविक काळात प्रतिपूर्ती मिळत नाही. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्यात नसलेल्या बाबी पुढे करून हेतुपरस्पर प्रतिपुतीपासून वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे. चार वर्षांपासून प्रतिपूर्ती दर कायम असल्याने दरवर्षी प्रतिपूर्ती दराच्या रक्कमेत २५ टक्क्याने वाढ करण्याची मागणीही रेटण्यात आली.
विद्युत बिल व इतर कर माफ करा
लॉकडाऊनमुळे आर्थिक येणे बंद असल्याने शाळा चालवणे कठीण झाल्याने शासनाच्या पगारदार शिक्षकाप्रमाणे इंग्रजी माध्यम शाळेच्या शिक्षकांना पगार द्यावा. शाळा इमारत कर यासह शाळा वाहन विमा व इतर कर यातून सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : लॉकडाऊनने मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहेत. इंग्रजी माध्यम शाळांना शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. संपूर्ण खर्च फी स्वरूपात येणाऱ्या पैशावर चालतो. शाळा बंद असल्याने फी येणे बंद आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यम शाळांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. इंग्रजी माध्यम शाळांना आर्थिक टंचाईतून सावरण्यासाठी शासनाने आरटीई अंतर्गत थकीत असलेले प्रतिपूर्ती तत्काळ अदा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टी असोसिएशनने केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. व शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे यांना मेस्टाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मेस्टाचे जिल्हा अध्यक्ष तथागत मेश्राम, वरिष्ठ उपाध्यक्ष शत्रूघ्न भांडारकर, कोषाध्यक्ष राकेश गजभिये, सहसचिव नरेंद्र निमकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष नेहा खैरे, शिवशंकर दुरुगकर, प्राचार्य श्रुती ओहळे, कमल विराणी, हेमंत चांदवस्कर, टिचकूले, योगेश खैरे व शमा खान उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक शाळांची आरटीई अंतर्गत प्रतिपूर्ती २०१७ पासून थकीत आहे. लॉकडाऊनमुळे शाळेला पैशाच्या स्वरूपात येणारी फी बुडाल्याने शाळांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. फीच्या स्वरूपात मिळणारे पैसे येणे बंद झाल्याने अनेक शाळांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
इंग्रजी माध्यम शाळांना शिक्षण विभागाकडून गैरवागणूक मिळत असून विभागस्तरावर असलेले अहवाल तक्रारकर्त्यांना पोहोचविल्या जात नसल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी मेस्टाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा