शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत अधिकाऱ्यांचे निवासस्थान शोभेची वास्तू

By admin | Updated: March 6, 2016 00:20 IST

येथील अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे.

संजय साठवणे साकोली येथील अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकारी यांचे निवासस्थान तर बाजार चौकातील सभापती यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान सध्या सार्वजनिक शौचालय बनले आहेत. त्यामुळे खंडविकास अधिकारी व सभापती यांना भाड्याच्या घरात रहावे लागते.साकोली हे नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडत असल्याने शासनाने येथील शासकीय कार्यालये व शासकीय सदनिका याची देखभाल व दुरूस्तीवर विशेष लक्ष देणे गरजेचे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या येथील कार्यालये व सदनीका दुर्लक्षित आहेत. मागील पाच वर्षापुर्वी लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानकाला अचानक आग लागली. त्या आगीत ही सदनिका पूर्णपणे जळून राख झाली. फक्त विटा मातीच्या भिंती उभ्या आहेत. मात्र त्यानंतर या इमारतीच्या दुरूस्तीकडे वा नवीन बांधकामाकडे लक्षच देण्यात आले नाही.बाजार चौकात सभापती भवन तयार करण्यात आले होते. मात्र मागील १० वर्षापुर्वी या सभापती भवनाला एकही ग्रहण लागले व ही भवन आता बाजारातील शौचालय झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.सदनिकाकडे दुर्लक्षजिल्ह्यातील जुना उपविभाग म्हणूनही साकोली तालुक्याची ओळख आहे. मात्र येथील अधिकाऱ्यासाठी व कर्मचाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या सदनिकांची अवस्था गंभीर असून त्या राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे घरभाड्यापोटी शासनाला महिन्याकाठी हजारो रूपये खर्च द्यावा लागतो.बांधकामासाठी निधीची बोंबाबोंबसाकोली येथे तहसिल कार्यालयाच्या बांधकामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले. मात्र त्यापुर्वी पासून सदनिका खराब आहेत. मात्र त्यांच्या दुरूस्तीसाठी व नवीन बांधकामासाठी निधीची बोंबाबोंब आहे. त्यामुळे शासन दुजाभाव करीत आहे, असा अधिकाऱ्यांची बोंब आहे.