शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

By admin | Updated: September 29, 2014 00:39 IST

एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या

भंडारा : एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत असायचे. त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर परिश्रम घेऊन उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होता. दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गाव अन् गाव प्रचारासाठी पिंजून काढत होते. आता प्रचार मोहीम ही संगणक युगात बदलेली आहे. काळ बदलला तशा प्रचाराच्या तऱ्हाही बदलल्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे पैशाशिवाय आता कोणतेच काम होत नाही.निवडणुका आल्या म्हणजे कार्यकर्तेही आता दिवाळी साजरी करु लागलेत. एरव्ही पाच वर्षे लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना विचारत नाही. मग आता का यांना सोडायचे, असे कार्यकर्ते बोलू लागलेत. निवडणुकीची तारीख ठरली. जे उमेदवार निश्चित आहेत त्यांच्याकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. वाहनांची बुकिंग झाली आहे. कार्यकर्त्यांना रोजंदारीही ठरली आहे. ४०० रुपए रोज, दोन वेळचा नाश्ता, दोन-तीन वेळा चहा आणि रात्रीचे जेवण, तेही हॉटेल किंवा धाब्यावरच असे करार कार्यकर्त्यांशी झाले आहेत. सकाळी १० वाजता गांड्यामध्ये बसायचे व मतदारसंघात फिरायचे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चितच आहे त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत.दि. १ आॅक्टोंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. त्यानंतर डोळ्यात तेल घालून उमेदवारांना यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी विश्वासातील कार्यकर्तेही हिमतीला हवेत. दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांचीही फळी उमेदवाराला तयार ठेवावी लागणार आहे. असे इमाने इतबारे पक्षाचे काम करणारे कार्यकर्तेही आहेत. दि.१ आॅक्टोंबरपासून प्रचार सुरु होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील चारचाकी वाहने उमेदवारांनी आरक्षित केले आहेत. उमेदवारी अर्ज भरतांना आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच या प्रक्रियेला दोन दिवसांत अधिक वेग येणार आहे. तेव्हाच विधानसभा निवडणुकीचे जिल्हयातील चित्र स्पष्ट होईल. आता केव्हा एकदाची निवडणूक सुरु होते आणि निवडणूक प्रक्रियेला गती येते याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.(प्रतिनिधी)