शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचा जलस्तर वाढला - बाधित गावे बुडण्याची भीती

By admin | Updated: September 18, 2014 23:29 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन

गोसीखुर्द धरण : जलस्तर २३९.५०० मीटरवर पोहोचलागोसे बु. : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसानंतर आज ३० सेंटीमिटरने धरणातील पाणायाची पातळी वाढून जलस्तर २३९.५०० मिटरवर पोहचला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बुडीत क्षेत्रातील अनेक गावे रिकामी करावी लागणार आहेत.मागील वर्षी धरणातील पाण्याची पातळी वाढविण्यास सुरुवात झाल्यानंतर २३० मिटर म्हणजेच १० टीएमसी जलस्तर साठवणुकीचे उद्दीष्ट नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण करण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुुर ुहोते. जलस्तर २३९.२०० मिटरवर जाताच पाथरी मधील अनेक घरात पाणी शिरले होते. सावरगावच्या चारही बाजूने पाणी होवून या गावाला जाणारा एकमात्र रस्ताही बुडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आंदोलन करून जलस्तर वाढविण्याला विरोध करून जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटणार नाही व प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रुपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळणार तो पर्यंत गाव सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होवून पाथरी मध्ये पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज झाला होता. त्यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. याचे पडसाद नागपूर हिवाळीअ धिवेशनात उमटले होते. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.१२५ मिटरवर स् थीर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गोसीखुर्दचा जलस्तर वाढविण्याचे काम १५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. रोज १० से.मी. ने जलस्तर वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिह्यातील ७ तर भंडारा जिल्ह्यातील ४ अशा एकूण ११ गावांना स्थानांतरीत करणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाथरी व सावरगावचा समावेश आहे. जामगावचे स्थानांतरण झाले आहे. प्रशासन पुनर्वसन विभाग सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही स्थितीशी निपटण्याची तयारी करून ठेवली आहे. (वार्ताहर)