रोखपालाच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त

By Admin | Updated: March 28, 2015 00:29 IST2015-03-28T00:29:02+5:302015-03-28T00:29:02+5:30

बँक आॅफ इंडिया शाखा कोंढा येथे आजूबाजूच्या २५ गावच्या लोकांचे खाते आहेत.

The customer is relieved by the cashless attitude of cash | रोखपालाच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त

रोखपालाच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त

कोंढा (कोसरा) : बँक आॅफ इंडिया शाखा कोंढा येथे आजूबाजूच्या २५ गावच्या लोकांचे खाते आहेत. येथे दररोज १०.३० पासून ग्राहकांची पैसे काढणे, भरणे करिता प्रचंड गर्दी असते. बँकेत दुपारी पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी ग्राहकांसोबत येथील रोखपाल उद्धट वागणूक करीत असतो. त्यामुळे सर्व ग्राहक त्यापासून त्रस्त आहेत.
कोंढा परिरातील एकमेव राष्ट्रीय कृत बँक म्हणून बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत पवनी तालुक्यातील अनेक गावच्या नागरिकांचे व्यवहार आहेत. व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, वृद्ध कर्मचारी स्त्री पुरूष सर्वाचे येथे खाते आहे. सकाळी १०.३० वाजता बँक उघडल्या बरोबर ग्राहक येथे गर्दी करतात. विड्राल करण्यासाठी ग्राहकांना एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागते. येथील रोखपाल तत्परतेने व्यवहार हाताळत नाही.
काही विचारले तर उद्धतपणे ग्राहकांशी हुज्जत करीत राहतो. कधीकधी राग आल्यास कॅश काऊन्टर बंद करतो. विड्राल फार्म चुकला तर समजावून न सांगता तो फेकून देतो. डोळे काढून व मोठ्या आवाजात ग्राहकांशी भांडण करतो अशा अनेक तक्रारी ग्राहकांना आहेत. त्याची ग्राहकांशी वागणूक योग्य नाही. कॅशिअरच्या ग्राहकांशी अरेरावीच्या वागणुकीमुळे सर्वच ग्राहक त्रस्त आहेत. दररोज ते ग्राहकांशी हुज्जतबाजी करतात. त्यांच्या तक्रारी व्यवस्थापन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ेलेखी तक्रारीद्वारे केली. पण त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. कोंढा परिसरातील २५ ते ३० गावातील एकमेव बँक आहे. अनेक लोकांनी येथे मोठ्या ठेवी ठेवल्या आहेत. पण कॅशिअरच्या अरेरावीच्या वागण्यामुळे ग्राहकांनी या बँकेसी असलेले व्यवहार कमी केले आहे. पण तरी देखिल त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही. बँक आॅफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅशिअरवर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी अमित जिभकाटे व ज्ञानदेव कुर्झेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)
रोखपालच्या संबंधात माझ्याकडे ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांना समज देण्यात आली आहे. वरिष्ठांनी देखिल विचारणा केली आहे.
- आनंद बावणे, व्यवस्थापक,
बँक आॅफ इंडिया, कोंढा-कोसरा.

Web Title: The customer is relieved by the cashless attitude of cash